पुणे | क्रीडा सहसंचालक डॉ.जयप्रकाश दुबळे हे महाराष्ट्र संघाचे नोडल ऑफिसर म्हणून काम पाहणार आहेत. तर पुण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांची महाराष्ट्राच्या पथक प्रमुख पदी निवड झाली आहे.
डॉ. जयप्रकाश दुबळे म्हणाले, खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी आम्ही खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिली आहे. तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व अधिकारी वर्ग परिश्रम घेत आहे.
सराव शिबिरात तज्ञ क्रीडा मार्गदर्शकांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदा देखील महाराष्ट्राचा संघ विजेतेपद मिळवेल असा आम्हाला विश्वास आहे.
विजय संतान हे पुण्याचे जिल्हा क्रीडाधिकारी असून मागील ३० वर्षांपासून क्रीडाक्षेत्रात कार्यरत आहेत. १५ वर्षांपासून ते विविध जिल्हयातील जिल्हा क्रीडाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
वर्धा, अमरावती, चंद्रपूर,यवतमाळ, गडचिरोली, हिंगोली, नागपूर याठिकाणी त्यांनी जिल्हा क्रीडाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. यासोबत महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनवर देखील ते कार्यरत आहेत.