विराट कोहली भारताचा एक यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. तो सध्या कोणत्याच क्रिकेट प्रकारामध्ये कर्णधार नसला तरी, फलंदाज म्हणून उत्तम कामगिरी करताना दिसत आहे. श्रीलंकेचा फलंदाज भानुका राजपक्षे याला वाटते की, खेळाडूसाठी कौशल्य ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु, फिटनेस असल्याशिवाय आधुनिक युगाच्या क्रिकेटमध्ये टिकून राहणे शक्य नाही, असे त्याला वाटते. फिटनेसच्या समस्येमुळे राष्ट्रीय संघातून वगळलेल्या राजपक्षेला आता भारताताचा माजी कर्णधार विराट कोहलीशी बोलायचे आहे, ज्याला तो ‘क्रिकेटचा क्रिस्टियानो रोनाल्डो’ मानतो.
इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा भाग असल्याने ३० वर्षीय खेळाडूला विराट कोहलीला भेटण्याची संधी मिळू शकते आणि त्याचा फायदा होईल अशी त्याला आशा आहे. राजपक्षे याने जानेवारी २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून आठवडाभरानंतर त्याने हा निर्णय मागे घेतला. पण त्याच फिटनेसच्या मुद्द्यामुळे त्याने गेल्या महिन्यात भारत दौऱ्यावर येण्याची संधीही गमावली होती. राजपक्षेला खात्री आहे की, पंजाब किंग्जसोबत दोन महिने घालवल्याने त्याला खूप फायदा होईल आणि त्याचा फिटनेस पुढच्या स्तरावर जाईल.
राजपक्षे (Bhanuka Rajapaksa) याने एका वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘आयपीएल ही जगातील सर्वोत्तम लीग आहे आणि तुम्हाला तुमच्या संघातील प्रत्येक सदस्याकडून खेळाबद्दल खूप काही शिकायला मिळते. त्यामुळे मी शिखर धवनकडून काही गोष्टी शिकत आहे. मयंक अग्रवाल याच्याशी माझे चांगले संबंध आहेत. कारण आम्ही १९ वर्षाखालील विश्वचषक एकत्र खेळलो आहे. तसेच संघाबाहेर विराट कोहली अशी व्यक्ती आहे, ज्याच्याशी मी बोलू शकतो आणि फिटनेसबद्दल काही सल्ला घेऊ शकतो. फिटनेसच्या बाबतीत तो खूप वेगळ्या पातळीवर आहे.’
तो म्हणाला, ‘माझ्यासाठी तो नक्कीच क्रिकेटचा क्रिस्टियानो रोनाल्डो आहे. तंदुरुस्ती आणि कौशल्याच्या बाबतीत त्याच्यासारख कोणी उत्तम नाही. तो खूप चांगला खेळतो आणि त्याच्याशी बोलून तुम्ही खूप काही शिकू शकता.’ त्याने आयपीएलमधील आपला पहिलाच सामना खेळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शास्त्री गुरूजी म्हणतायेत, “मला आयपीएलमध्ये १५ कोटी मिळाले असते”