इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गन यानं संघाचा मुख्य प्रशिक्षक बनण्याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं सांगितलं की, तो इंग्लंड संघाचा कोच बनणार नाही. इऑन मॉर्गनला जेव्हा याबाबत विचारणा करण्यात आली, तेव्हा त्यानं याला पूर्णपणे नकार दिला. तो म्हणाला की, सध्या त्याच्याकडे इंग्लडचा मुख्य प्रशिक्षक बनण्यासाठी वेळ नाही.
वास्तविक, गेल्या काही काळापासून मर्यादित षटकांमध्ये इंग्लंडची कामगिरी फारसी खास राहिली नाही. मॅथ्यू शॉर्टच्या कोचिंगमध्ये संघ टी20 विश्वचषकाचं विजेतेपद डिफेंड करू शकला नाही. याशिवाय 2023 एकदिवसीय विश्वचषकातही इंग्लंडची कामगिरी खूपच खराब राहिली होती. त्यामुळे मॅथ्यू शॉर्ट यांची संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी केली जाऊ शकते आणि इऑन मॉर्गन त्यांची जागा घेऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.
मात्र जेव्हा मॉर्गनला याबाबत विचारण्यात आलं, तेव्हा त्यानं स्पष्ट शब्दांत नकार दिला. मॉर्गननं ‘स्काय स्पोर्ट्स’शी बातचीत करताना म्हटलं, “ही माझ्यासाठी एक बातमी आहे. जेव्हा एखाद्या प्रशिक्षकावर प्रश्नचिन्ह उभे राहतात, तेव्हा निश्चितच ती चांगली गोष्ट नाही. त्यांच्या भविष्याबाबत अनेक प्रश्न उभे होत आहेत. मात्र काय होईल, हे येणार काळच सांगेल. गेल्या काही महिन्यांपासून मला कोचिंगबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. मात्र माझं सरळ उत्तर आहे की, सध्या माझ्याकडे तेवढा वेळ नाही. मी कोचिंग करू इच्छितो, मात्र मला अजून माझ्या कुटुंबाला वेळ द्यायचा आहे. मी सध्या समालोचनासह घरात कुटुंबासोबत मॅच पाहण्यात वेळ घालवतो. सध्या मी जे काही करतो आहे, त्यात मला आनंद मिळतोय.”
नुकतीच इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर बाबतही बातमी आली होती, त्याचंही कर्णधारपद जाऊ शकतं. संघाच्या खेळाडूंनी आणि सपोर्ट स्टाफनं बटलरबाबत जो फिडबॅक दिला होता, तो पॉझिटिव्ह नव्हता. बोललं जात आहे की, जोस बटलर स्वत: कर्णधारपदाचा राजीनामा देऊ शकतो. म्हणजेच, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंडच्या नेतृत्वामध्ये मोठा बदल केला जाऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
राहुल आरसीबीत; रोहित-बुमराह अन् सूर्या मुंबईची साथ सोडणार? आयपीएल 2025 पूर्वी सर्व मोठे अपडेट्स जाणून घ्या
पाहा, अशी करतात फलंदाजी! गंभीरच्या भारताच्या स्टार फलंदाजाला टिप्स; सराव सत्राचा VIDEO व्हायरल
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी स्टार क्रिकेटपटू बाबा बागेश्वर धामच्या दर्शनाला, पाया पडून घेतला आशिर्वाद