पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्या दरम्यान सध्या तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. कराची येथे सुरू असलेल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानचा दुसरा डाव खेळला गेला. या डावात पाकिस्तानचा माजी कर्णधार व अनुभवी फलंदाज अझर अली हा अखेरच्या वेळी कसोटी क्रिकेट खेळताना दिसला. या आधीच निवृत्तीची घोषणा केलेला अझर आपल्या या अखेरच्य डावात खातेही न खोलता तंबूत परतला. अशा प्रकारे त्याच्या शानदार आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची अखेर दुर्दैवी झाली.
अली याने या सामन्यापूर्वीच आपण आपला अखेरचा सामना खेळणार असल्याचे जाहीर केले होते. सामन्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून त्याचा सन्मान केला गेलेला. कसोटीच्या पहिल्या डावात त्याने शानदार 45 धावांची खेळी केली होती. मात्र, दुसऱ्या डावात तो खातेही खोलू शकला नाही. इंग्लंडचा फिरकीपटू जॅक लिच याने त्याचा चौथ्या चेंडूवर त्रिफळा उडवला. त्यामुळे त्याच्या शानदार कसोटी कारकिर्दीची अखेर शून्याने झाली.
For the final time.
Farewell, @AzharAli_ 💚#PAKvENG | #UKSePK pic.twitter.com/IBlftcxxXR
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 19, 2022
तो बाद होऊन परतत असताना इंग्लंडच्या सर्व खेळाडूंनी त्याच्याशी हस्तांदोलन केले. यादरम्यान त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. तसेच ड्रेसिंग रूम कडे जात असताना पाकिस्तानच्या खेळाडूंनी त्याला गार्ड ऑफ ऑनर दिला.
Thank you, Azhar 🙌#PAKvENG | #UKSePK pic.twitter.com/kOL3UDrIgk
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 19, 2022
त्याच्या कसोटी कारकिर्दीचा विचार केला गेल्यास त्याने आपल्या कारकिर्दीत 97 सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले. काही काळ तो संघाचा कर्णधार देखील होता. त्याने आपल्या कारकीर्दीत 7142 धावा पूर्ण केल्या. यादरम्यान त्याची सरासरी 42.26 अशी होती. त्याने यादरम्यान 19 शतके, 2 द्विशतके व एक त्रिशतक साजरे केलेले. काही दिवसांपूर्वीच त्याने पाकिस्तानसाठी शंभर कसोटी खेळण्याचा मानस बोलून दाखवलेला. मात्र, त्याने अचानक थांबण्याचा निर्णय घेतला.
(Azhar Ali Out On Duck In His Last Test Inning)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ट्रॉफीचे चुंबन आणि स्टेजवर डान्स; विश्वचषक जिंकल्यानंतर लिओनल मेस्सीने ‘असा’ केला जल्लोष
मेस्सीने चाहत्यांना दिलेला शब्द मोडला! विश्वचषक जिंकताच बदलला निर्णय