पुणे। उद्या भारत विरुद्ध श्रीलंका संघात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, गहुंजे येथे तिसरा आणि शेवटचा टी20 सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याची भारताला संधी आहे. तर श्रीलंका हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
याआधी इंदोर येथे झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला होता. या सामन्यात भारताकडून वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने शानदार कामगिरी केली होती.
त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 23 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. यातील इसरु उडाना आणि लसिथ मलिंगा यांच्या विकेट्सने त्याने त्याचे चौथे षटक टाकताना शेवटच्या 2 चेंडूंवर घेतल्या होत्या.
त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला होता की जर पुण्यात होणाऱ्या टी20 सामन्यात शार्दुलने त्याच्या पहिल्याच षटकातील पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तर ही हॅट्रिक समजली जाणार का?
पण याचे उत्तर असे आहे की जरी शार्दुलने उद्याच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी ही त्याची हॅट्रिक समजली जाणार नाही. कारण इंदोर आणि पुणे टी20 हे दोन वेगवेगळे सामने आहेत आणि तो दोन वेगवेगळ्या सामन्यांमध्ये मिळून जरी विकेट्सची हॅट्रिक होत असेल तरी ती हॅट्रिक समजली जात नाही.
इंदोरमधील टी20 सामन्यातून शार्दुलने भारतीय टी20 संघात तब्बल 22 महिन्यांनी पुनरागमन केले होते. इंदोर टी20 सामन्याआधी तो भारताकडून मार्च 2018मध्ये बांगलादेश विरुद्ध शेवटचा टी20 सामना खेळला होता.
माझ्यासाठी या देशाविरुद्ध खेळणे मोठे आव्हान असेल- रोहित शर्मा
वाचा- 👉https://t.co/Wrj0BmrS1Q👈#म #मराठी #Cricket @ImRo45— Maha Sports (@Maha_Sports) January 9, 2020
कोहलीच ठिक आहे, पण अन्य खेळाडूंची कसोटी क्रमवारी नक्की पहा!
वाचा👉https://t.co/1fwifiaVwz👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) January 9, 2020