मागच्या वर्षी टी-20 विश्वचषकात मिळालेल्या अपयशानंतर विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार झाला. त्यानंतर ही जबाबदारी रोहित शर्माकडे आली. रोहित सध्या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघाचा नियमित कर्णधार आहे. पण यादरम्यान तो अनेकदा विश्रांतीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. न्यूझीलंडविरुद्ध सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत देखील शिखर धवन संघाचे नेतृत्व करत आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने रोहित शर्मा याच्यावर निशाणा साधला.
आकाश चोप्रा याच्या मते पुढच्या वर्षी भारतात आयसीसीचा एकदिवसीय विश्वचषक खेळला जाणार आहे. असात रोहित शर्मा (Rohit Sharma) याने शक्य असेल तितक्या जास्त सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करावे आणि सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनला खेळवण्याचा प्रयत्न देखील केला पाहिजे. चोप्राच्या मते या सर्व गोष्टींचा फायदा संघाल आगामी विश्वचषक स्पर्धेत होईल. दरम्यान रोहितने मागच्या वर्षी संघाचे नियमित कर्णधारपद स्वीकारल्यानंतर आतापर्यंत एकूण सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. तर दुसरीकडे त्याच्या अनुपस्थितीत शिखर धवन (Shikhar Dhawan) यादरम्यानच्या काळात जास्त एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून खेळला आहे. धवनने यादरम्यान सात एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. न्यूझीलंडविरुध्या एकदिवसीय मालिकेतील पुढेचे दोन सामने विचारात घेतले, तर हा आकडा ९ होतो.
आकाश चोप्राच्या मते जगभरातील इतर संघ त्यांच्या कर्णधारामध्ये जास्त बदल करताना दिसत नाही, पण भारत मात्र असे करत आहे. याचे कारण चोप्राला समजू शकले नाहीये. माध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, “श्रीलंका संध्या अफगाणिस्तानसोबत खेळत आहे आणि दासुन शनाका त्यांचा कर्णधार आहे. इंग्लंडनेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळली आणि जोस बटलर अजूनही कर्णधार होता. ऑस्ट्रेलियामध्ये थोडा बदल केला, पण पॅट कमिन्स याने तीन पैकी दोन सामन्यांत संघाचे नेतृत्व केले. जर जगभरातील सर्व संघ त्यांच्या नियमित कर्णधारासोबत खेळत आहेत, तर आपण कर्णधारांमध्ये एवढे बदल का करत आहोत? हा एक चागंला प्रश्न आहे.”
“संघ बनवण्याची जबाबदारी कर्णधारावर असते. एक कर्णधार आणि एकच प्रशिक्षक खूप फायदेशीर ठरतो. कारण जेवढा अधिक वेळ तुम्ही संघासोबत असता, तितक्याच चांगल्या पद्धतीने तुम्ही खेळाडूंना ओळखू लागता. शिखर धवन मागच्या तीन एकदिवसीय मालिकांमध्ये संघाचे नेतृत्व करत आहे. अशात आता बांगलादेशला गेल्यानंतर तो कर्णधार नसेल. तसेच संघाचे सलामीवीर फलंदाज देखील बदलले जातील. जेव्हा संघात एवढे बदल होत असतील, तेव्हा तुमची तयारी चांगली नसते,” असेही आकाश चोप्रा म्हणाला.
दरम्यान, आकाश चोप्राने पुढे बोलताना असेही सांगितले की, रोहित शर्माने आगामी काळात कमीत कमी विश्रांती घेतली पाहिजे. जर विश्रांती हवी असेल, तर ती आयपीएलदरम्यान घ्यावी. संघ व्यवस्थापनाने येत्या काळात त्यांचा सर्वत्कृष्ट संघ खेळण्यासाठी मैदानात उतरवला पाहिजे, असेही त्याला वाटते. (Akash Chopra is upset with Rohit Sharma who is on rest during the New Zealand tour)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्यकुमार भारताच्या ‘या’ फलंदाजाचा फॅन! स्वत:च सांगितले कारण, नाव ऐकून व्हाल चकित
विराटला आठवला पाकिस्तानविरुद्धचा सामना, इंस्टाग्रामवर खास फोटो पोस्ट करत दिली ‘ही’ रिऍक्शन