भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान तिसरा कसोटी सामना सिडनी येथे गुरुवारपासून (7 जानेवारी) सुरु झाला आहे. या सामन्यातून ऑस्ट्रेलियन संघाकडून विल पुकोस्कीने आपले आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण केले आहे. ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात दोन बदल करत जो बर्न्स व ट्राइवस हेडच्या जागी डेव्हिड वॉर्नर व विल पुकोस्कीला संघात स्थान दिले आहे. यादरम्यानच कसोटी पदार्पण करणाऱ्या पुकोस्कीचा रिकी पाँटिंग सोबतचा जुना फोटो वायरल होत आहे.
या फोटोबद्दल रिकी पाँटिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुकोस्कीबद्दल बोलताना पाँटिंग म्हणाले, “मी विलला फार पूर्वी भेटलो आहे. मी तेव्हा बॉलिंग मशीनने त्याला एक चेंडू टाकला. तो त्याने उत्तम प्रकारे खेळला होता. मला तेव्हाच जाणवलं की हा मुलगा खास खेळाडू असणार आहे.” विशेष म्हणजे पुकोस्कीला अनेकजण ऑस्ट्रेलियाचा भविष्या पाँटिंग असल्याचे म्हणतात.
A very young Will Pucovski with Ricky Ponting back in the day ???? pic.twitter.com/pzFnDzQBJM
— 7Cricket (@7Cricket) January 7, 2021
दरम्यान पुकोस्कीने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक झळकावले आहे. पुकोस्कीने 110 चेंडूचा सामना करत 62 धावांची उत्तम खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने 4 चौकारही मारले. सामन्याचा विचार केला असता पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून पावसामुळे केवळ 55 षटकांचाच खेळ झाला आहे. यात ऑस्ट्रेलियाने 2 गडी गमावत 166 धावांपर्यंत मजल मारली आहे. मार्नस लॅब्यूशाने 67 तर स्टिव्ह स्मिथ 31 धावांवर नाबाद आहे.
पुकोस्कीची प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्द –
पुकोस्कीने आत्तापर्यंत खेळलेल्या 24 प्रथम श्रेणी सामन्यात त्याने तब्बल 54.50 च्या सरासरीने 1744 धावा केलेल्या आहेत. यावेळी पुकोस्कीने 6 शतक व 5 अर्धशतक देखील झळकावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
पहावं ते नवलंच! मार्नस लॅब्यूशानेने बॅटची ग्रीप बसवल्यावर केले असे काही की तुम्हालाही येईल हसू
वॉर्नरच्या बाद होण्याच्या पद्धतीवर माजी खेळाडूंनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह, म्हणाले…