जगातील सात आश्चर्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ताजमहालाची (taj mahal) यात्रा करण्यासाठी दररोज लाखोंच्या संखेत लोक येत असतात. दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्सही (AB de Villiers) एके दिवशी त्याची पत्नी डॅनियल सोबत ताज महाल पाहण्यासाठी गेला होता आणि त्या ठिकाणी त्याने तिला लग्नासाठी प्रपोजही केले होते. अशात ताजमहालच्या आठवणी एबी डिविलियर्स याच्यासाठी खास आहेत. परंतु, एक गोष्ट अशी आहे, जी त्या दिवशी डिविलियर्सच्या इच्छेनुसार घडली नव्हती. आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना डिविलियर्सने याविषयी माहिती दिली.
आयपीएल २०१२ दरम्यान डिविलियर्सने डॅनियलला ताजमहालसमोर प्रपोज केले होते आणि त्यानंतर २०१३ मध्ये दोघांनी विवाह केला. आता त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. सध्या त्यांचा संसार व्यवस्थित चालला आहे आणि अशात डिविलियर्सने ताजमहालच्या त्या दौऱ्याविषयी एक खंत व्यक्त केली आहे. त्यादिवशी डिविलियर्सने घातलेल्या कपड्यांमुळे तो आजही निराश आहे.
आरसीबी पॉडकास्टवर बोलताना डिविलियर्स म्हणाला की, “त्यादिवशी मी घातलेल्या कपड्यांविषयी मला दुःख आहे. मी पाठीमागे वळून पाहतो तर वाटते की, मी काय घातले होते ? ती कसली जिन्स आहे ? ती त्या हालक्या पॅची जिन्ससारखी आहे, ज्यामध्ये एक मोठा बॉटम आहे. तो टी-शर्ट माझ्याकडे अजूनही आहे. माझी बायको ते टाकून देऊ देत नाही, त्यामुळे रात्रीच्या वेळी मी त्याचा वापर करतो.”
ताज महाल दौऱ्याविषयी बोलताना डिविलियर्स पुढे म्हणाला की, “मी याचे खूप आधीच नियोजन केले होते. मला वाटले की ताजमहालपेक्षा रोमँटिक जागा कोणतीच नाहीय. यासाठी थोडे नियोजन करावे लागले. आदल्या रात्री आम्ही मोठा विजय मिळवला होता आणि माझ्या लक्षात आहे की, मी दोन-तीन वाजेपर्यंत जल्लोष करत होतो. दिल्लीसाठी रवाना होताना आम्ही थकलो होते, पण हा एक अविश्वसनीय प्रवास होता.”
“कॅमेरे तयार होते आणि जशी ती तयार झाली, मी म्हणालो आपण ताजमहालला फिरायला चाललो आहोत. हा एक अप्रतिम अनुभव होता. काही लोकांना हे थोडे विचित्र वाटेल, पण इतरांसाठी मी त्या क्षणाला चांगले बनवले आणि एक स्टँडर्स सेट केला,” असे डिविलियर्स पुढे म्हणाला.
त्याव्यतिरिक्त डिविलियर्सने बेंगलोर शहर घरच्यासारखे असल्याचे सांगितले. दरम्यान, मागच्या वर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा केल्यामुळे आयपीएल २०२२ मध्ये डिविलियर्स खेळताना दिसणार नाही. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी तो अनेक हंगाम खेळला आहे.
महत्वाच्या बातम्या –
वाह बावा! कारकिर्दीतील पहिल्याच आयसीसी स्पर्धेत केली कपिल पाजींची बरोबरी; वाचा सविस्तर
केवळ ‘ती’ अट मान्य झाल्याने विराटने आरसीबीसाठी खेळण्यास दिलेला होकार
बंगलोर एफसीचे दमदार पुनरागमन; रोखली जमशेदपूर एफसीची विजयी घोडदौड