भारतात खेळल्या जात असलेल्या आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाची जबरदस्त कामगिरी सुरू आहे आणि संघाने सातव्या सामन्यात न्यूझीलंडचा 190 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. पुण्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील आफ्रिकन संघाने किवींना विजयासाठी एकही संधी दिली नाही आणि विश्वचषक 2023 स्पर्धेतील सहावा विजय नोंदवला. या विजयानंतर एकदिवसीय विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेची न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेने 24 वर्षांनंतर प्रथमच एकदिवसीय विश्वचषकात न्यूझीलंडचा पराभव केला आहे.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेला शेवटचा विजय 1999 च्या विश्वचषकात मिळाला होता. त्या सामन्यात आफ्रिकन संघाने 74 धावांनी विजय मिळवला होता. मात्र, त्यानंतर न्यूझीलंडने प्रत्येक वेळी दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्यात यश मिळवले. 1999 च्या विश्वचषकानंतर आणि 2023 च्या विश्वचषकापूर्वी या दोन संघांमध्ये पाच सामने खेळले गेले होते आणि ते सर्व न्यूझीलंड संघाने जिंकले होते.
मात्र, 2023 मध्ये हा दुष्काळ संपला आणि दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला पराभूत केले. बुधवारी (1 नोव्हेंबर) पुण्यात झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना क्विंटन डी कॉक आणि रॅसी व्हॅन डर ड्युसेन यांच्या शतकी खेळीच्या जोरावर 50 षटकांत 4 बाद 357 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाचा एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही आणि 35.3 षटकांत 167 धावात सर्व संघ बाद झाला.
न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर, दक्षिण आफ्रिकेने सात सामन्यांत सहा विजयांसह 12 गुण मिळवले आणि चांगल्या नेट रनरेटमुळे या संघाने भारताला पहिल्या स्थानावरून खाली ढकलले आणि उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले. या विश्वचषकात न्यूझीलंडचा हा सलग तिसरा पराभव आहे. चार विजयांसह न्यूझीलंड संघ चौथ्या स्थानी गेला आहे. (Africa beat New Zealand for the first time in 24 years)
म्हत्वाच्या बातम्या
पहिला फोर, दुसरा दांडा! भारतीय संघाला मोठा धक्का, दिलशानने रोहितला धाडलं तंबूत
वानखेडेवर श्रीलंकेने भारताला दिलं फलंदाजीचं आमंत्रण, रोहितसेनेत कोणताही बदल नाही; पाहा Playing XI