सध्या पाकिस्तानी खेळाडू पाकिस्तान प्रीमियर लीग अर्थात पीएसएलचा हंगाम खेळण्यात व्यस्त आहेत. हा हंगाम संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईमध्ये खेळवला जात आहे. यापूर्वी हा हंगाम पाकिस्तानमध्येच झाला होता. मात्र कोरोनामुळे मध्यात स्थगित करण्यात आला होता. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उर्वरित हंगाम युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला.
मात्र या दरम्यान एका पाकिस्तानी खेळाडूचा व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होतो आहे. हा खेळाडू पाकिस्तानमध्ये घरोघरी जाऊन चक्क गाड्या वाटतो आहे. हा खेळाडू म्हणजे पाकिस्तानचा माजी सलामीवीर अहमद शहजाद.
अहमद शहजाद सध्या पाकिस्तानमध्ये काही लोकांच्या घरी जाऊन त्यांना टुव्हिलर देत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यामागील कारण आता समोर आले आहे. त्याचे झाले असे की एका क्रीडा संकेतस्थळाने पाकिस्तान सुपर लीगच्या सामन्यांदरम्यान चाहत्यांना त्यांचा संघ निवडण्यासाठी सांगितले होते. प्रत्येक सामन्या दरम्यान जे अकरा खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करू शकतात असे वाटते, त्यांचा संघ निवडायचा होता.
या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस म्हणून चक्क टुव्हिलर देण्यात आली. मात्र या नशिबवान विजेत्यांना केवळ टुव्हिलरच मिळाली नाही तर, त्यांच्या आवडत्या खेळाडूला भेटण्याची संधी देखील मिळाली. अहमद शहजादने या नशिबवान विजेत्यांना घरोघरी जाऊन ही भेट दिली. हाच व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
.@iamAhmadshahzad visited the homes of the lucky #JubileeMyStars11 bike winners to distribute prizes 👏
You can also get a chance to meet your heroes. All you have to do is make your Fantasy Team 🥳
LINK ➡️ https://t.co/oa6W3ApD0J #FantasyTeamBanao #CricwickPeAao pic.twitter.com/GchLLZFpWK
— CricWick (@CricWick) June 17, 2021
अहमद शहजादची कारकीर्द
अहमद शहजाद हा पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज आहे. त्याने पाकिस्तानकडून १३ कसोटी, ८१ वनडे आणि ५९ टी२० सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने ४०.९२ च्या सरासरीने ९८२ धावा तर वनडे क्रिकेटमध्ये ३२.५६ च्या सरासरीने २६०५ धावा केल्या आहेत. तर टी२० क्रिकेटमध्ये त्याने २५.८१ च्या सरासरीने १४७१ धावा केल्या आहेत. शहजादची ओळख एक गुणी फलंदाज म्हणून आहे. पण सातत्याच्या अभावामुळे त्याला पाकिस्तान संघात फारशा संधी मिळत नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ कारणामुळे शमी, बुमराह, ईशांत करु शकले नाहीत प्रभावी मारा, न्यूझीलंडच्या दिग्गजाने मांडले मत
उसेन बोल्ट झाला जुळ्या मुलांचा पिता, हटके नावे ठेवल्याने आला चर्चेत
पावसामुळे किवी खेळाडू ‘हा’ इनडोअर खेळ खेळण्यात झाले दंग; फोटो व्हायरल