क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज रविवार, दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी झालेल्या अंतिम सामन्यात अहमदनगर पेरियार पँथर्स संघाने नाशिक द्वारका डिफेडर्स संघाला नमवत विजेतेपद पटकावले. अंत्यत चुरशीचा झालेला हा सामन्यात शेवटच्या क्षणी अहमदनगर संघाने बाजी मारली. अहमदनगरच्या विजयाचा शिल्पकार आदित्य शिंदे ठरला.
नाणेफेक जिंकत नाशिक संघाने मैदानाची निवड करत अहमदनगर संघाला चढाई करण्यासाठी निमंत्रण दिल. पहिल्याच चढाईत आदित्य शिंदे ने बोनस गुण मिळवत अहमदनगर संघाचा खात उघडलं. तर नाशिक संघाच्या पहिल्या चढाईत आकाश शिंदे ने 1 गुण मिळवत आपल्या संघाचा खात उघडलं. आदित्य शिंदे गुण मिळवत संघाची आघाडी वाढवली. 1-8 असा नाशिक संघ पिछाडीवर असताना नाशिकच्या सिद्धांत संदशीव ने बोनस प्लस गुण मिळवत आकाश शिंदेला मैदानात आणले. पुढील चढाईत आदित्य शिंदेचा सुपर टॅकल करत नाशिक संघाने आपली पिछाडी कमी केली. मात्र त्यानंतर अहमदनगरच्या अभिषेक पवार ने आकाश शिंदेंचा सुपर टॅकल करत परत अहमदनगर संघाला आघाडी मिळवून दिली.
अहमदनगर संघाने मध्यांतरा पर्यत नाशिक संघाला एक वेळा ऑल आऊट करत 24-17 अशी आघाडी मिळवली होती. आदित्य शिंदे ने पहिल्याच हाफ मध्ये 15 गुण मिळवत अहमदनगर संघाला महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली होती. तर नाशिकच्या आकाश शिंदे मध्यांतरा पर्यत 9 गुण मिळवले होते मात्र त्याला अहमदनगरच्या बचावफळीने 3 वेळा पकड करत खूप वेळ बाहेर ठेवल होता. मध्यांतरा नंतर पहिल्या चढाईत आकाश शिंदे ने 2 गुण मिळवले तर त्याला प्रतिउत्तर देत अहमदनगरच्या आदित्य शिंदे ने सुद्धा 2 गुण मिळवत संघाची 7 गुणांची आघाडी कायम ठेवली होती.
अंतिम सामन्याची शेवटची दहा मिनिटं शिल्लक असताना अहमदनगर संघाकडे 31-27 अशी अवघ्या 4 गुणांची आघाडी होती. त्यानंतर आदित्य शिंदेंचा सुपर टॅकल करत सामना 31-29 असा झालेला. त्यानंतर अहमदनगर संघाने आकाश शिंदेंची पकड केली त्याचा प्रतिउत्तर नाशिक संघाच्या आदिनाथ मते ने आदित्य शिंदेचा सुपर टॅकल करत दिले. शेवटची पाच मिनिटं शिल्लक असताना सामना 33-33 असा बरोबरी होता. त्यानंतर अंत्यत चुरशीचा झालेला सामना अखेरच्या क्षणी आदित्य शिंदे ने नाशिक संघाल ऑल आऊट सामना अहमदनगरच्या बाजूने झुकवला. अहमदनगर संघाने 44-40 असा विजय मिळवत क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीजचे विजेतेपद पटकावले.
अहमदनगर संघाकडून आदित्य शिंदे ने चढाईत 23 गुण मिळवले. तर अभिषेक पवार ने पकडीत 5 गुण मिळवत महत्वपूर्ण भूमिका निभावली. नाशिक संघाकडून आकाश शिंदे ने 14 गुण मिळवले मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. तर शिवकुमार बोरगोडे ने अष्टपैलू खेळ करत 9 गुण प्राप्त केले. (Ahmednagar Periyar Panthers won K. M. P. Youth Kabaddi Series title)
बेस्ट रेडर- आदित्य शिंदे, अहमदनगर पेरियार पँथर्स
बेस्ट डिफेंडर- अभिषेक शिंदे, अहमदनगर पेरियार पँथर्स
कबड्डी का कमाल- आदित्य शिंदे, अहमदनगर पेरियार पँथर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलचा 1000 वा सामना जयस्वालने बनवला अविस्मरणीय! वानखेडेवर खेळली 124 धावांची ऐतिहासिक खेळी
रोहित शर्माला आयपीएलमध्ये हवे होते ‘या’ संघाचे कर्णधारपद, जुन्या सहकारी खेळाडूचा मोठा दावा