fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

आयपीएलमध्ये असा पराक्रम करणारा अमित मिश्रा पहिलाच भारतीय

दिल्ली। गुरुवारी(18 एप्रिल) आयपीएल2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात फिरोजशहा कोटला स्टेडीयमवर 34 वा सामना पार पडला. या सामन्यात दिल्लीला 40 धावांनी पराभव स्विकारावा लागला.

मात्र दिल्लीला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी त्यांचा फिरकी गोलंदाज अमित मिश्राने आयपीएलमध्ये एक खास विक्रम केला आहे. त्याने या सामन्यात 3 षटकात 18 धावा देत 1 विकेट घेतली. ही विकेट त्याने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला त्रिफळाचीत करत घेतली.

ही त्याची आयपीएलमधील 150 वी विकेट होती. त्याच्या आता आयपीएलमध्ये 140 सामन्यात 150 विकेट्स झाल्या आहेत.  त्यामुळे तो आयपीएलमध्ये 150 विकेट्सचा टप्पा पूर्ण करणारा पहिलाच भारतीय तर एकूण दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे.

याआधी आयपीएलमध्ये फक्त लसिथ मलिंगाने 150 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. मलिंगाने आत्तापर्यंत 115 सामन्यात 162 विकेट्स घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाराही गोलंदाज आहे.

गुरुवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 168 धावा केल्या होत्या आणि दिल्ली कॅपिटल्स समोर 169 धावांचे आव्हान ठेवले होते. परंतू या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सला 20 षटकात 9 बाद 128 धावाच करता आल्या.

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज – 

162 विकेट्स – लसिथ मलिंगा (115 सामने)

150 विकेट्स – अमित मिश्रा (140 सामने)

146 विकेट्स – पियूष चावला (152 सामने)

143 विकेट्स – ड्वेन ब्रावो (126 सामने)

141 विकेट्स – हरभजन सिंग (153 सामने)

महत्त्वाच्या बातम्या –

धोनीसारखा खेळाडू स्टंम्पमागे असल्याने मी नशीबवान आहे – विराट कोहली

विश्वचषक २०१९ साठी पाकिस्तानचा १५ जणांचा संघ जाहीर

विश्वचषकाच्या आधीच लसिथ मलिंगा घेणार निवृत्ती?

You might also like