गुरुवारी(27 जून) भारतीय संघ 2019 विश्वचषकात विंडीज विरुद्ध खेळणार आहे. पण या सामन्याआधी विंडीजला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसल गुडघा दुखापतीमुळे या विश्वचषकातून बाहेर पडला आहे.
रसलला 14 जूनला इंग्लंड विरुद्ध खेळताना गुडघा दुखापतीचा त्रास झाला होता. त्यामुळे तो 22 जूनला न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या सामन्यात खेळला नव्हता.
तसेच रसलची या विश्वचषकातील कामगिरीही खास झालेली नाही. त्याला या विश्वचषकात 3 डावात फलंदाजी करताना केवळ 36 धावा करता आल्या. तर त्याने गोलंदाजीत 5 सामन्यात 5 विकेट्स घेतल्या.
आता या विश्वचषकातील विंडीजच्या उर्वरित सामन्यांसाठी सुनिल अँब्रिसची रसलचा बदली खेळाडू म्हणून निवड झाली आहे. 26 वर्षीय अँब्रिस भारताविरुद्धाच्या सामन्याआधी विंडीज संघात सामील होईल. त्याने विंडीजकडून आत्तापर्यंत 6 कसोटी आणि 6 वनडे सामने खेळले आहेत.
विंडीजला या विश्वचषकात आत्तापर्यंत 6 सामन्यांपैकी फक्त 1 सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर चार सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे आणि त्यांचा 1 सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे सध्या गुणतालिकेत विंडीजचा संघ 3 गुणांसह 8 व्या स्थानावर आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–टीम इंडियाने या गोलंदाजाला घेतले इंग्लंडला बोलावून, घेऊ शकतो भूवनेश्वर कुमारची जागा
–एकवेळच्या धोनीच्या सर्वात आवडत्या गोलंदाजाने केले क्रिकेटला अलविदा
–या खेळाडूने आयपीएलमध्ये खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा होता विरोध