सध्या संयुक्त अरब अमिरात आणि नेपाळ या संघामध्ये क्रिकेटचा सामना खेळवला जातोय. या सामन्याला आयसीसीने एकदिवसीय सामन्याची मान्यता दिली आहे. या सामन्यात यूएई संघाला अजबच शिक्षा मिळाली आहे. नेपाळ संघाची फंलदाजी चालू असताना यूएईच्या एका गोलंदाजाने असे काही कृत्य केेले ज्याची शिक्षा पूर्ण संघाला भोगावी लागली. या कृत्यामुळे यूएई संघाला 5 धावांचा दंड ठोठावण्यात आला आणि नेपाळला काहीही न करता 5 धावा मिळाल्या.
आयसीसीने नेपाळ विरूद्ध यूएई या सामन्याला एकदिवसीय सामन्याचा दर्जा दिला. त्यामुळे आयसीसीचे सर्व नियम या सामन्यात लागू झाले. यूएई आणि नेपाळ या संघामध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नेपाळ संघ फलंदाजी करत होता आणि यूएईचा गोलंदाज अलीशान शरफू याच्या हातात चेंडू होता. त्यावेळी अलीशानने चेंडू चमकवण्यासाठी थुंकीचा वापर केला आणि त्याचे हे कृत्य मैदावरील पंचाच्या नजरेत आले. या कृत्यामुळे यूएई संघाला 5 धावांचा दंड ठोठावण्यात आला, ज्यामुळे त्याचा संघ अडचणीत आला.
आयसीसीच्या नियमानुसार चेंडूला थुंकी लावणे नियमबाह्य आहे. दोन वर्षाआधी जगात कोराना विषाणूचा संसर्ग झपाट्यानेे वाढत होता. या विषाणूचा संसर्ग थुंकीच्या माध्यमातून देखील होत असल्याने आयसीसीने चेंडूला थुंकी लावण्यावर स्थायी बंदी घातली होती.
नेपाळ आणि यूएई या संघात दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी (दि. 16 नोव्हेंबर) खेळला गेला. यूएईने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. यूएईची पूर्ण संघ 43.2 षटकात 191 धावा करत तंबूत परतला. यूएई संघाकडून मोहम्मद वसीम याने सर्वाधिक 50 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या नेपाळ संघाने हे लक्ष्य 7गडी गमावत 47.5 षटकात पार केले आणि यूएई संघावर 3 गडी राखून विजय मिळवला.(Applying saliva on ball is banned in all ICC matches)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जबरदस्त! इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनेडत मिचेल स्टार्कने दाखवला इनस्विंगचा दम, जेसन रॉय क्लीन बोल्ड
अखेर अमेरिकेतील टी20 लीगला सापडला मुहूर्त; शाहरुखच्या नाईट रायडर्ससह हे संघ मैदानात