वनडे विश्वचषक 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघ शनिवारी (28 ऑक्टोबर) आमने सामने आले. उभय संघांतील हा सामना रोमांचक ठरला. कारण पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने मोठी धावसंख्या उभी केली. सलामीवीर ट्रेविस हेड याच्या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलिया संघाने 388 धावा उभ्या केल्या. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यानेही महत्वपूर्ण 81 धावांची खेळी केली.
न्यूझीलंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ 49.2 षटकात सर्वबाद झाला. पण तोपर्यंत त्यांनी मोठी धावसंख्या केली होती. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (65 चेंडूत 81 धावा) आणि ड्रेविस हेड (67 चेंडूत 109 धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी 175 धावांची भागीदारी केली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेला मिचेल मार्स याने 36 दावांची खेळी केली. स्टीव स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन यांनी प्रत्येकी 18-18 धावांची खेळी करून विकेट्स गमावल्या. मात्र, त्यानंतर आलेल्या ग्लेन मॅख्सवेल आणि जोश इग्लिस यांनी पुन्हा संघाचा डाव सावरला. मॅक्सवेल 41, तर इग्लिस 38 धावा करून बाद झाला. कर्णधार पॅट कमिन्स यानेही 37 धावांचे योगदान दिले. मिचेल स्टार्क याने 1, तर ऍडम झाम्पा याने शुन्य धावांचे योगदान दिले. जोश हेजलवूड नॉन स्ट्राईक एंडवर एकही चेंडू न खेळता नाबाद राहिला.
दक्षिण आफ्रिका संघासाठी ट्रेंट बोल्ट आणि ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या धावांवर त्यांना लगाम लावता आली नाही. मिचेल सँटनर याने 10 षटकांमध्ये तब्बल 80 धावा खर्च केल्या आणि दोन विकेट्स घेतल्या. मॅच हेन्री आणि जेम्स निशम यांनीही प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया – पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वार्नर, मिशेल मार्श, स्टीव स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, ट्रेविस हेड, मिशेल स्टार्क, जोश हेजलवूड, ऍडम झम्पा.
न्यूझीलंड – टॉम लॅथम (कर्णधार आणि यष्टीरक्षक), डेवॉन कॉनवे, विल यंग, रचिन रविंद्र, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.
महत्वाच्या बातम्या –
CWC 23 Points Table: पाकिस्तानच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशांना झटका, दक्षिण आफ्रिकेने भारताला पछाडले
नाद केला पण पुरा केला! हेडच्या बॅटमधून निघालं वर्ल्डकप 2023मधलं तिसरं वेगवान शतक, खेळले फक्त ‘एवढे’ चेंडू