सध्या भारतीय महिला क्रिकेट संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. दौऱ्याच्या सुरुवातीला झालेल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत भारतीय संघाने 2-1 असा विजय संपादन केला होता. त्यानंतर रविवारी (16 जुलै) उभय संघांमध्ये वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी 43 षटकांच्या झालेल्या सामन्यात भारतीय संघाला नामुष्कीरित्या 40 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे, भारतीय महिला संघ बांगलादेशविरुद्ध वनडे सामन्यात पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दोन्ही संघांमध्ये झालेल्या टी20 मालिकेत भारतीय संघाने विजय संपादन केला होता. मात्र, बांगलादेश अखेरच्या सामन्यात विजय मिळवून व्हाईटवॉश टाळलेला. रविवारी सुरू झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
पावसाच्या व्यत्ययामुळे 43 षटकांच्या झालेल्या या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. पदार्पण करणाऱ्या अमनज्योत कौर हिने 9 षटके गोलंदाजी करताना केवळ 31 धावा देताना चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तर, देविका वैद्यने दोघींना बाद केले. भारतीय संघासमोर विजयासाठी केवळ 153 धावांचे आव्हान होते.
या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ सहज विजय नोंदवेल असे वाटत होते. मात्र, मारूफा अख्तर व रबिया खान यांच्या गोलंदाजी पुढे भारतीय फलंदाज तग धरू शकले नाहीत. दोघींनी अनुक्रमे चार व तीन बळी मिळवले. भारतीय संघाकडून केवळ दीप्ती शर्मा 20 धावांचा टप्पा पार करू शकली. भारताचा डाव 35.5 षटकांत 113 धावांवर आटोपला. भारतीय महिला संघाचा हा बांगलादेशविरुद्ध वनडेतील पहिला पराभव आहे.
(Bangaladesh Women Beat India Womens First Time In ODI)
महत्वाच्या बातम्या –
‘अनारकली’चा उल्लेख करून रोहितने स्वत:च्या पायावर मारली कुऱ्हाड, पत्नी रितिकाने खोलली पोल; कमेंट व्हायरल
खूपच कमी वयात आफ्रिदीची कसोटीत मोठी कामगिरी, श्रीलंकेच्या सलामीवीराची विकेट घेताच रचला विक्रम; पाहा व्हिडिओ