यावर्षी चालू झालेल्या वुमेन्स प्रीमियर लीग या भारतातील महिला टी20 लीगला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला. यापूर्वीच विदेशात अशा अनेक लीग खेळल्या जात होत्या. त्यामुळे महिला क्रिकेटचे आणखी व्यापक स्वरूप करण्यासाठी, लवकरच एक मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. यामध्ये भारत, इंग्लंड व ऑस्ट्रेलियातील महिला लीग विजेत्या व उपविजेत्या संघांना प्रवेश देऊन वुमेन्स टी20 चॅम्पियन्स लीग सुरू करण्याचा विचार आहे.
ऑस्ट्रेलियातील एका आघाडीच्या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, भारतात महिला क्रिकेटला मिळत असलेल्या अभूतपूर्व पाठिंब्यानंतर आताच बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया व इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड पुढील वर्षी महिलांची नवी टी20 चॅम्पियन्स लीग खेळवण्याचा विचार करत आहेत. यामध्ये या तीनही देशातील टी20 लीगचे विजेते व उपविजेते सहभागी होतील. याबाबतची केवळ प्राथमिक चर्चा झाली असून, उघडपणे प्रसारमाध्यमांसमोर कोणीही काही बोललेले नाही.
जवळपास पाच वर्षांच्या प्रतीक्षा नंतर यावर्षी मार्चमध्ये भारतात पहिली वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धा मुंबईत पार पडली. सहा संघांनी सहभाग नोंदवलेल्या या स्पर्धेला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबई इंडियन्स ने अंतिम सामन्या दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत विजेतेपद पटकावले होते. या लीगमध्ये भारतासह इतर देशातील मान्यवर महिला क्रिकेटपटू देखील सहभागी झालेल्या. त्यामुळेच आगामी काळात या चॅम्पियन्स लीगची मुहूर्तमेढ रोवली जाऊ शकते.
ऑस्ट्रेलिया त्यांची वुमन्स बिग बॅश लीग ही स्पर्धा अनेक वर्षांपासून खेळली जात आहे. तर, इंग्लंडमध्ये टी20 ब्लास्ट व द 100 या स्पर्धा होतात. याव्यतिरिक्त वेस्ट इंडीजमधील कॅरेबियन प्रीमियर लीग ही स्पर्धा देखिल याच वर्षी सुरु झाली आहे.
(BCCi Cricket Australia And ECB Thinking About New Womens T20 Champions League)
महत्वाच्या बातम्या –
‘रोहित शर्मा फरारी आहे, पण तो…’, माजी दिग्गजाचे विधान वेधतंय क्रिकेटप्रेमींचं लक्ष
क्रिकेट विश्वचषकातील सर्वात नाट्पूर्ण सामना; इंग्लंड ठरला होता विश्वविजेता, तर पराभूत न होताही न्यूझीलंड मात्र उपविजेता