2023 विश्वचषक स्पर्धेत भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटूंसाठी काहीच ठीक चाललेले दिसत नाही. पाकिस्तान संघातील अनेक क्रिकेटपटू व्हायरल फिव्हरचे बळी पडले आहेत. यातील अनेक खेळाडूंचे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सामन्यात खेळणे कठीन असल्याचे मानले जात आहे. व्हायरल फिव्हरमुळे पाकिस्तानी संघाचे आजचे सराव सत्रही रद्द करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताविरुद्धच्या सामन्यापासून त्यांची तब्येत खराब आहे.
भारताने शनिवारी, 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव करून आयसीसी वनडे स्पर्धेत कधीही न हरण्याचा विक्रम कायम ठेवला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात रोहित शर्माने 86 धावांची शानदार खेळी केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानी सलामीवीर अब्दुल्ला शफीक आजारी असल्याने त्याचे पुढील सामन्यात खेळणे कठीण असल्याचे सांगितले जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक पाकिस्तानी खेळाडूंना व्हायरल तापाची लागण झाली आहे, त्यामुळे त्यांना चाचणी करण्यास सांगण्यात आले आहे. पाकिस्तानी खेळाडूंना डेंग्यूची लागण झाली आहे का, असेही सोशल मीडियावर बोलले जात आहे. विश्वचषकापूर्वी भारताचा शुभमन गिल आणि त्यानंतर प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगलेही डेंग्यूला बळी बनले होते.
पाकिस्तानचा विश्वचषक 2023 मधील पुढचा सामना 20 ऑक्टोबरला बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी सर्व खेळाडू तंदुरस्त असनं खुप महत्वाचं आहे. पाकिस्तानने या विश्वचषकात आतापर्यत तीन सामने खेळले आहेत तर त्यातील दोन सामने जिंकले आहेत. एका सामन्यात भारताकडून मोठा पराभन स्विकारावा लागला होता. (Big blow to Pakistan before match against Australia Many cricketers are suffering from viral fever)
महत्वाच्या बातम्या –
माजी खेळाडू दक्षिण आफ्रिकेला पडला महागात! पहिले चार खेळाडू स्वस्तात बाद, एकट्या रॉल्फने…
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानला मोठा झटका, संघातील ‘हे’ खेळाडू तापाने फणफणले