क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. नेपाळ क्रिकेट संघ टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. विशेष म्हणजे, नेपाळ संघ तब्बल 10 वर्षांनंतर टी20 विश्वचषकात खेळताना दिसेल. यापूर्वी नेपाळ क्रिकेट संघाने 2014मध्ये टी20 विश्वचषकासाठी क्वालिफाय केले होते. मात्र, संघाला खास प्रदर्शन करता आले नव्हते. नेपाळ संघ गट साखळी फेरीतून बाहेर पडलेला. मात्र, आता संघाने 2024च्या टी20 विश्वचषकासाठी क्वालिफाय केले आहे.
आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक आशिया क्वालिफायर फायनल्सच्या (ICC Mens T20I World Cup Asia Finals 2023) उपांत्य सामन्यात शुक्रवारी (दि. 03 नोव्हेंबर) नेपाळने यूएई संघाला 8 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. या विजयासह नेपाळ (Nepal) संघ टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेसाठी पात्र (nepal cricket team qualified for 2024 t20 world cup) ठरला.
👏Qualified for ICC Men's T20 WORLD CUP 2024: Asia Qualifiers Semifinal #VICTORY: #Nepal 135/2 in 17.1 overs (Aasif Sheikh 63*, R Paudel 35*, G Jha 22) beat #UAE 134/9 (V Aravind 64, Kushal Malla 3/11, S Lamichhane 2/14) by 8 wickets and qualified for T20 World Cup 2024. #T20I pic.twitter.com/EStG2chusz
— Cricket Nepal (@NepalCricket) November 3, 2023
सामन्याचा आढावा
काठमांडू येथील मुलपाणी क्रिकेट मैदानावर यूएई विरुद्ध नेपाळ संघ आमने-सामने होते. या सामन्यात यूएईने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 134 धावा केल्या होत्या. तसेच, नेपाळ संघाला विजयासाठी 135 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळ संघाने 17.1 षटकातच 2 विकेट्स गमावत 135 धावा केल्या. तसेच, हा सामना 8 विकेट्सने आपल्या खिशात घातला.
यावेळी नेपाळकडून फलंदाजी करताना यष्टीरक्षक आसिफ शेख याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 51 चेंडूत 64 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याच्या खेळीत 1 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार रोहित पौडेल (Rohit Paudel) यानेही नाबाद 34 धावांची विजयी खेळी केली. तसेच, गुलसान झा याने 22 धावा, तर सलामीवीर कुशल भुर्तेलने 11 धावा केल्या. यावेळी यूएईकडून गोलंदाजी करताना निलांश केसवानी आणि बेसिल हमीदने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या यूएई संघाकडूनही यष्टीरक्षक फलंदाजच चमकला. अरविंदने 51 चेंडूत 64 धावांची खेळी केली. या खेळीत 2 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त फक्त मुहम्मद वसीम याने 26 धावांचे योगदान दिले. त्यांच्याव्यतिरिक्त इतर एकही फलंदाज 20 धावांचा आकडा गाठू शकला नाही.
यावेळी नेपाळकडून गोलंदाजी करताना कुशल मल्लाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच, संदीप लामिछाने याने 2 विकेट्स घेतल्या. त्यांच्याव्यतिरिक्त सोमपाल कामी आणि रोहित पौडेल यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.
वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार स्पर्धेचं आयोजन
टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेचे आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघांचा सहभाग असणार आहे. या 20 संघांना प्रत्येकी 5 अशा 4 गटात विभागले जाणार आहे. (big news nepal cricket team qualified for 2024 t20 world cup)
हेही वाचा-
नवाबांच्या शहरात नेदरलँड्सने जिंकला Toss, विराटशी भांडण संपवणारा खेळाडू अफगाणी ताफ्यातून बाहेर
‘वन टू का फोर…’, गाणं वाजताच विराटने लावले ठुमके, पाहून तुमचेही थिरकतील पाय; पाहा व्हिडिओ