आगामी वनडे विश्वचषक यावर्षी 5 ऑक्टोबरपासून भारतात खेळला जाणार आहे. इंग्लंडचा दिग्गज बेन स्टोक्स वनडे विश्वचषकासाठी तयार आहे. स्टोक्सने मागच्या वर्षी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर त्याने आपली निवृत्ती मागे घेतली आहे. चाहते आणि जाणकार याविषयी व्यक्त होत आहेत. अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी कर्णधार टिम पेन याने स्टोक्सच्या या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.
वनडे विश्वचषक 2023ची सुरुवात 5 ऑगस्ट रोजी अहमदाबादमध्ये होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामनाही याच ठिकाणी 19 सप्टेंबर रोजी याच ठिकाणी खेळला जाणार आहे. मागच्या वर्षी बेन स्टोक्स (Ben Stokes) इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार बनला. याच पार्श्वभूमीवर त्याने वर्कलोडचे कारण देत वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण यावर्षीच्या विश्वचषकात त्याची भूमिका संघासाठी महत्वाची असणार, हे संघ व्यव्सथानाला आधीच माहीत होते. स्टोक्सने देखील संघ व्यवस्थापनाच्या आग्रहानंतर वनडेतून निवृत्ती मागे घेतली. मात्र, हॅरी ब्रुक () याला आपेल वनडे विश्वचषक संघातील स्थान गमावावे लागले. स्टोक्स अचानक संघात आल्यामुळे मागच्या मोठ्या काळापासून संघाचा नियमित फलंदाज असणाऱ्या ब्रुकला विश्वचषकात खेळता येणार नाहीये.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टिम पेन (Tim Paine) याने ब्रुकला बाहेर सलावे लागणार, याविषयी खास प्रतिक्रिया दिली. टिम पेन नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “बेन स्टोक्स वनडे क्रिकेटमधून घेतलेली निवृत्ती माघे घेत आहे, जे खूपच रंचक वाटते. माझ्या मते हे, मी, मी आणि फक्त मीपणा आहे, बरोबर ना? मी सांगणार की मला कधी खेळायची इच्छा आहे. मी फक्त मोठ्या स्पर्धांमध्येच खेळणार. जे खेळाडू 12 महिने खेळले त्यांना धन्यवाद. आता तुम्हा जाऊन बेंचवर बसा कारण आता मी खेळण्यासाठी इच्छूक आहे.”
दरम्यान, पेनने यावेळी विश्वचषक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार असणाऱ्या तीन संघांची नावेही सांगितली. पेनच्या मते इंग्लंड आणि भारतासह वनडे विश्चषक जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ देखील आपला दावा ठोकत आहे. (Big statement by Tim Paine about Ben Stokes’ comeback in ODI)
महत्वाच्या बातम्या –
‘यांच्या’मुळे जबरदस्त कमबॅक करू शकलो! आयर्लंडला पहिल्या टी-20त मात दिल्यानंतर बुमराहची खास प्रतिक्रिया
पावसाच्या व्यत्ययात टीम इंडियाच्या पदरी पडला विजय! बुमराहचे यशस्वी पुनरागमन