जकार्ता | एशियन गेम्समध्ये भारताला रोहन बोपन्ना आणि दिवीज शरण यांनी पुरुष दुहेरीत टेनिसमध्ये सुवर्णपदक मिळवुन दिले आहे. त्यांनी कझाकिस्तानच्या अलेझांडर बब्लिक आणि डेनिस येस्वेयव जोडीचा ६-४, ६-३ असा पराभव केला.
हा सामना सुमारे ५२ मिनीटे चालला.
एशियन गेम्समधील भारताचे हे पुरुष दुहेरीतील हे ५वे सुवर्णपदक ठरले आहे. आजच सकाळच्या सत्रात भारताने रोविंगच्या Quadruple Sculls प्रकारात सुवर्णपदक मिळवले आहे.
भारताने स्पर्धेत आतापर्यंत ६ सुवर्ण, ४ रौप्य आणि १२ कांस्य अशी एकुण २२ पदके जिंकली असुन पदकतालिकेत भारत ७व्या स्थानावर आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–दिग्गज भारतीय गोलंदाज झुलन गोस्वामीची टी२० क्रिकेटमधून निवृत्ती
–विराट कोहलीचा कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा डंका
–इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिका: पृथ्वी शॉ, हनुमा विहारीचा प्रथमच टीम इंडियामध्ये समावेश