आयपीएलमध्ये सोमवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंगलोर सामना झाला. यात दिल्ली कॅपिटल्स संघाने ६ विकेट्सने शानदार विजय मिळवला. याबरोबर मुंबई इंडियन्सपाठोपाठ दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघ आयपीएल २०२० प्ले ऑफसाठी पात्र ठरलेले संघ ठरले.
आयपीएल २०२०साठी पात्र ठरणारा दिल्ली कॅपिटल्स दुसरा तर रॉयल चॅलेंजर बेंगलोर तिसरा संघ ठरला. दिल्ली कॅपिटल्स संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध क्वॉलिफायर १चा सामना ५ नोव्हेंबर रोजी खेळणार आहे. तर रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स किंवा सनरायझर्स हैदराबादमधील एक संघ इलिमीनेटरमध्ये ६ नोव्हेंबर रोजी भिडणार आहे.
हैदराबादला विजय महत्त्वाचा
आयपीएलमध्ये साखळी फेरीत मुंबई इंडियन्स सर्वाधिक १८ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. मुंबईचा एक सामना अजूनही बाकी असून तो मंगळवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. या सामन्यात हैदराबादने विजय मिळवला तर ते प्ले ऑफसाठी पात्र ठरतील परंतू पराभव झाला तर केकेआर संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरणारा चौथा व शेवटचा संघ ठरणार आहे.
अंतिम सामन्याला पात्र होण्यासाठी मुंबई दिल्लीला मिळणार दोन संधी
दिल्ली कॅपिटल्स संघाचे १६ गुण झाले असून त्यांच्या दुसऱ्या स्थानाला मंगळवारी होणाऱ्या सामन्याने कोणताही धोका नाही. त्यामुळे मुंबई व दिल्ली संघांना क्वॉलिफायर खेळायला मिळणार असल्याने अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी दोनही संघांना दोन वेळा संधी मिळणार आहे.
सलग ४ सामन्यात पराभूत होऊनही बेंगलोर प्ले ऑफला पात्र
दुसऱ्या बाजूला रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघांचे १४ सामन्यात १४ गुण झाले आहेत. बेंगलोरचे १० सामन्यानंतरही १४ गुण होते. ते सलग ४ सामन्यात पराभूत झाले आहेत. तरीही नेटरनरेटच्या आधावर या संघाने प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना इलिमीनेटरचा सामना खेळावा लागणार आहे.
आयपीएल २०२० प्ले ऑफचे सामने
५ नोव्हेंबर- मुंबई इंडियन्स विरुद्द दिल्ली कॅपिटल्स
६ नोव्हेंबर- रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स किंवा सनरायझर्स हैदराबाद
७ नोव्हेंबर- ५ नोव्हेंबरचा पराभूत संघ विरुद्ध ६ नोव्हेंबरचा विजेता संघ
महत्त्वाच्या बातम्या-
प्रशिक्षकाच्या ‘त्या’ ७ वर्षांपुर्वीच्या सल्ल्याने बदलले ऋतुराजचे जीवन, आता ठरला सीएसकेचा मॅच विनर
‘धोनीच्या शेवटच्या सामन्यासाठी पाहायचीय मोठी गर्दी,’ इंग्लंडच्या दिग्गजाचे वक्तव्य
DC vs RCB: पहिल्या डावानंतर चित्र स्पष्ट; दोन्ही संघांसाठी क्वालिफायचं समीकरण अखेर ठरलं!
ट्रेंडिंग लेख-
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?
प्ले ऑफ अभी दूर नहीं! ३ जागा, ३ संघ आणि २ सामने; पाहा कशी आहेत प्लेऑफची समीकरणे
IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे