भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी(24 जूलै) बायजू(BYJU’s) हे भारतीय संघाचे नवीन जर्सी प्रायोजक असल्याचे घोषित केले आहे. बायजू हे अग्रगण्य शैक्षणिक ऍप आहे. तसेच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान या बायजू कंपनीचा ब्रँड अँबेसिडर आहे.
बायजू या नवीन प्रायोजकाबद्दल जाहिर करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात बीसीसीआयने म्हटले आहे की ‘बीसीसीआय भारताच्या अग्रगण्य शैक्षणिक ऍप बायजूचे भारतीय संघाचे अधिकृत प्रायोजक म्हणून स्वागत करत आहे. बायजू हे 5 सप्टेंबर 2019 ते 31 मार्च 2022 पर्यंत भारतीय संघाचे प्रायोजक असतील.’
‘बायजू हे भारताचे सध्याचे प्रायोजक ओप्पो( OPPO)कडून सर्व जबाबदाऱ्या आपल्या हाती घेणार आहेत. बायजू आता सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात होणाऱ्या मालिकेपासून भारतीय संघाच्या जर्सीवर दिसेल.’
बीसीसीआयचे सीइओ राहुल जोहरी यांनी बीसीसीआयच्या वतीने ओप्पोचे आभार मानले . तसेच बायजूचे भारतीय संघाचे नवीन प्रायोजक म्हणून अभिनंदन केले.
बायजूचे संस्थापक आणि सीइओ बायजू राविंद्रन म्हणाले, ‘आम्हाला भारतीय संघाचे प्रायोजक होताना अभिमान वाटत आहे. क्रिकेट हा सर्व भारतीयांसाठी श्वास आहे आणि आम्ही आमच्या आवडत्या संघाचा अविभाज्य भाग होत असल्याने रोमांचित झालो आहोत.’
तसेच ओप्पो इंडियाने बीसीसीआय आणि भारतीय संघाचे आभार मानले आहेत. ओप्पोने 2017 मध्ये भारतीय संघाच्या प्रायोजकाचा हक्क 5 वर्षांसाठी जिंकला होता. हा करार 1079 कोटी रुपयांचा होता.
त्यांनी त्यावेळी वीवो मोबाईल्सच्या 768 कोटीं रुपयांच्या बोलीला मागे टाकत हा हक्क मिळवला होता. या करारानुसार ओप्पो बीसीसीआयला द्विपक्षिय क्रिकेट सामन्याचे 4.61 कोटी रुपये आणि आयसीसी स्पर्धेच्या सामन्याचे 1.56 कोटी रुपये देत होते.
UPDATE🚨: BYJU'S to be new #TeamIndia sponsor
More details – https://t.co/OXgn45kYrJ pic.twitter.com/Xmxt2VAZ5q
— BCCI (@BCCI) July 25, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–बीसीसीआयचे अधिकारी म्हणतात ‘…म्हणून रवी शास्त्रींना मुख्य प्रशिक्षकपदी कायम करावे’
–‘सिक्सर किंग’ ख्रिस गेल-युवराज सिंग आज येणार आमने-सामने
–२०११ विश्वचषकात ज्याच्या चेंडूवर धोनीने मारला होता विजयी षटकार तो होतोय निवृत्त