क्रिकेटमध्ये अनेकदा अविश्वसनीय झेल पाहायला मिळतात. बऱ्याच वेळा खेळाडू आपला जीव धोक्यात घालून असे झेल घेतात. सध्या आयपीएलचा 17 वा हंगाम सुरू आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या जात असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात कॅमरुन ग्रीननं एक असाच झेल घेतला. हा झेल पाहिल्यानंतर मैदानावरील खेळाडू, स्टेडियममधील प्रेक्षक आणि टीव्हीवर सामना पाहणारी प्रत्येक व्यक्ती हैराण झाली होती.
आरसीबीच्या कॅमरुन ग्रीननं आपल्या उंचीचा फायदा घेत हवेत उडी मारून एका हातात शानदार कॅच घेतला. त्याच्या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा झेल पाहून कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहलीच्या आनंदाला सीमा राहिली नाही.
वास्तविक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनं नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरची सुरुवात चांगली राहिली. फिल सॉल्ट आणि सुनील नारायण यांनी येताच शॉट्स खेळायला सुरुवात केली. मात्र डावाच्या 5व्या षटकात सॉल्ट सिराजचा शिकार बनला. यानंतर पुढच्याच षटकात यश दयालनं सुनील नारायणची विकेट घेतली. याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर यश दयालनं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अंगक्रिश रघुवंशीला बाद केलं. कॅमरुन ग्रीननं त्याचा एका हातात अविश्वसनीय झेल घेतला.
यश दयालच्या चेंडूवर रघुवंशीनं मिड विकेटच्या दिशेनं फ्लिक शॉट खेळला. मात्र तेथे कॅमरुन ग्रीन उभा होता. ग्रीननं हवेत उडी मारून एका हातानं शानदार झेल घेतला. त्याचा झेल पाहून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस फार आनंदी झाले होते. रघुवंशी या सामन्यात काही कमाल करू शकला नाही. त्यानं 4 चेंडूत 3 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना केकेआरनं निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 222 धावा केल्या.
Nothing gets past the Green machine! 🤯#KKRvRCB #TATAIPL #IPLonJioCinema pic.twitter.com/Ot6qatYtG8
— JioCinema (@JioCinema) April 21, 2024
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईनं रोहित शर्माला काढून हार्दिकला कर्णधार का बनवलं? रॉबिन उथप्पा म्हणाला, “रोहितची आकडेवारी…”