भारतीय संघाचा कसोटी स्पेशलिस्ट फलंदाज चेतेश्वर पुजारा गोलंदाजांसाठी अनेकदा मोठी बाधा ठरला आहे. जेव्हा कधी पुजारा खेळपट्टीवर उपस्थित असतो, तेव्हा गोलंदाजच्या डोक्यात त्याला बाद कसे करायचे, हा एकच विचार असतो. त्याने भारतीय संघाला आतापर्यंत अनेक मालिका जिंकवून दिल्या आहेत. एरवी गोलंदाजांना घाम फोडणारा पुजारा ऑस्ट्रेलियन गोलंदाज नाथन लायनसमोर मात्र काहीचा सावध असतो. त्याने स्वतः याविषयी खुलासा केला आहे.
यात कसलीही शंका नाही की, पुजाराने जगभरातील दिग्गज गोलादांना थकवले आहेत. पण असे म्हटले जाते की, प्रत्येक महान फलंदाजासाठी एक खास गोलंदाज देखील असतो. पुजारासाठी तो गोलंदाज म्हणजे नाथन लायन (Nathan Lyon) आहे. पुजाराने लागयला एक विश्वस्तरीय गोलंदाज म्हटले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २०२०-२१ मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत लायनने पुजाराची चांगलीच कोंडी केली होती, असे त्याने स्वतः सांगितले आहे. त्यापूर्वी २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) चांगलाच चमकला होता. त्याने या कसोटी मालिकेत तब्बल ११३५ चेंडूंचा सामना केला होता.
पुजाराने डॉक्यूमेंटरी सिरीज ‘बंदो मे था दम’ मध्ये सांगितेल आहे की, “नाथन लायन एक विश्वस्तरीय गोलंदाज आहे. त्याला माहिती होते की, माझी योजना काय होती. २०२०-२१ कसोटी मालिकेच्या आधी लायनने २०१८-१९ मालिकेचे सर्व व्हिडिओ पाहिले होते. तो या आव्हानासाठी तयार होता, कारण त्याची गती आणि लाईन वेगळी होती. तो मझ्याकडून प्रत्येक दुसऱ्या चेंडूवर मागे सरकण्याची अपेक्षा ठेवत होता, जी त्याच्यासाठी चांगली गोष्ट होती. माझ्यासाठी त्याचा सामना करणे कधीच सोपे नव्हते.”
२०१८-१९ बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये चेतेश्वर पुजाराने कमाल प्रदर्शन केले होते. ४ कसोटी सामन्यांच्या या मालिकेत त्याने ५२१ धावा केल्या होत्या. परंतु २०२०-२१ बॉर्ड गावस्कर मालिकेत मात्र त्याला अपेक्षित प्रदर्शन करत आले नाही. त्याने यावर्षी मालिकेत खेळल्या ३ अर्धशतकांच्या मदतीने २७१ धावा केल्या होत्या. नाथन लायनने त्याची कोंडी केली असली, तरी तो पुजाला फक्त एकदा बाद करू शकला. दुसरीकडे दिग्गज पॅट कमिन्सने मात्र पुजाराला ५ वेळा बाद केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘मी उमरान इतक्या वेगाने गोलंदाजी करू शकत नाही, पण…’ भारतीय गोलंदाजाने उलघडले मनातलं गुपित
कार्तिकने केली ‘किंग खान’ सारखी एन्ट्री! व्हिडिओ पाहून तु्म्हीही म्हणाल, ‘वाह क्या बात है!’
कार्तिकने केली ‘किंग खान’ सारखी एन्ट्री! व्हिडिओ पाहून तु्म्हीही म्हणाल, ‘वाह क्या बात है!’