न्यूझीलंड संघासाठी (Newzealand team ) २१५ वनडे सामने खेळलेल्या ख्रिस केर्न्स याला ( Chris cairns) ४ महिन्यांपूर्वी हृदय विकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्या अवयवांनी काम करणं बंद केलं होतं. तो पुन्हा उठणार की नाही हा प्रश्न अनेकांना पडला होता. परंतु त्याच्या चाहत्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. त्याने एक फोटो शेअर केला आहे , जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.(Chris cairns tweet)
Officially ‘out on leave’ from hospital for Xmas…but before I left decided it was time to give one last push & managed to get up first go. Gave the UCH boys a fright 😂 First in the pool…now on land. Long way to go, but hell of a way to sign out for Christmas!! #notdoneyet pic.twitter.com/sHtoixtlUk
— Chris Cairns (@chriscairns168) December 23, 2021
चार महिन्यांपूर्वी ऑगस्ट महिन्यात ख्रिस केर्न्सला ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबरामध्ये (Canberra) आपल्या राहत्या घरी हृदय विकाराचा झटका आला होता. त्यावेळी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर त्याला सिडनीला नेण्यात आले होते. त्याच्यावर चौथ्यांदा हृदयाची शस्त्रक्रिया झाली असती परंतु दुर्दैवाने ती राहून गेली. पण या दौऱ्याचा त्याच्यावर खूप परिणाम झाला आणि तो कमरेपर्यंत अर्धांगवायू झाला होता.
या आजारातून बाहेर आल्यानंतर तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तुम्ही पाहू शकता की तो, स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारताना दिसून येत आहे. तसेच व्हील चेअरवर बसून आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत क्रिकेट खेळताना दिसून येत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Backyard cricket & pool time = summer. Happy to be here, grateful for great mates. ☀️❤️🙏 #notdoneyet #backyardcricket #mates #summer pic.twitter.com/4Fp197aC3r
— Chris Cairns (@chriscairns168) December 30, 2021
ख्रिस केर्न्सची कारकीर्द (Chris cairns stats)
ख्रिस केर्न्सने न्यूझीलंड संघासाठी एकूण ६२ कसोटी सामने खेळले. यामध्ये ३३.५ च्या सरासरीने त्याने ३३२० धावा केल्या. यादरम्यान त्याने ५ शतक आणि २२ अर्धशतक झळकावले. तसेच गोलंदाजी करताना त्याने २१८ गडी बाद केले होते. तसेच २१५ वनडे सामन्यात त्याने २९.५ च्या सरासरीने ४९५० धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने ४ शतक आणि २६ अर्धशतक झळकावले होते. तसेच गोलंदाजी करताना त्याने २०१ गडी बाद केले होते. तसेच २ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याला ३ धावा करण्यात यश आले होते.
महत्वाच्या बातम्या :
जोहान्सबर्ग कसोटीसाठी भारतीय संघात होणार दोन बदल? अश्विन-शार्दुलचा पत्ता कट?
‘भारतीय संघ भित्रेपणाने खेळला, असे वाटले’, टी२० विश्वचषकातील कामगिरीबाबत रवी शास्त्रींचे मोठे भाष्य
हे नक्की पाहा :