भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने महाराष्ट्र शासन व मुंबई महानगरपालिकेचे कौतूक केले आहे. जे लोक सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे, त्यांच्यासाठी शासनाने सुरु केलेल्या हेल्पलाईनसाठी रहाणेने हे कौतूक केले आहे. Ajinkya Rahane stresses on mental health help amid lockdown.
भारतात २४ मार्चपासून २१ दिवसांचे लाॅकडाऊन सुरु आहे. हे लाॅकडाऊन १४ एप्रिलपर्यंत चालणार आहे. परंतु जे लोक पुर्णवेळ घरात राहताय त्यांच्याही अनेक मानसिक समस्या आता पुढे येत आहे. यावर अजिंक्यने प्रकाश टाकला आहे.
या लाॅकडाऊनच्या काळात लोकांनी मानसिक दृष्ट्याही व्यवस्थित रहाणे गरजेचे आहे. याचसाठी मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र शासनाने एक हेल्पलाऊईन सुरु केली आहे.
“सध्या मानसिक स्वाथ्य हेही तेवढंच गरजेचं आहे. यासाठी हेल्पलाईन सुरु केलेल्या महाराष्ट्र शासन, मुंबई महानगरपालिका व एमपाॅवरचे मी मनापासून आभार मानतो,” असे रहाणेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटमध्ये रहाणेने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही टॅग केले आहे.
Mental health is also important during this lockdown. Highly appreciate the efforts of Maharashtra Government, BMC & Mpower for creating a free helpline to support people for their mental wellbeing. @AUThackeray @mybmc @NeerjaBirla
📞 1800 120 820050— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) April 3, 2020
Thank you @ajinkyarahane88 for helping us reach out to max people possible https://t.co/z7zy8Ut2Ov
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 3, 2020
अजिंक्य रहाणे राजस्थान राॅयल्सकडून आयपीएल खेळतो. तसेच तो सध्या आयपीएल पुढे ढकलल्यामुळे घरीच आहे. रहाणे भारताकडून ६५ कसोटी, ९० वनडे व २० टी२० सामने खेळला आहे. त्यात या प्रकारात अनुक्रमे ४२०३, २९६२ व ३७५ धावा केल्या आहेत.
रहाणे आयपीएलमध्ये राजस्थान, पुणे व दिल्ली संघाकडून खेळला असून १४० सामन्यात त्याने ३२.९३च्या सरासरीने त्याने ३८२० धावा केल्या आहेत.
सध्याच्या ट्रेंडिंग घडामोडी-
–आयपीएलबद्दलची ही आहे सर्वात मोठी बातमी, जाणून घ्या कधी होणार आयपीएल
–कोरोना बाधीतांच्या मदतीसाठी कुणाला माहित होऊ न देता दान करणारे ४ क्रिकेटपटू
–पाकिस्तानच्या क्रिकेटपटूची युवी-भज्जीकडे मदतीची याचना
–भारताकडून केवळ १ कसोटी खेळलेला खेळाडू करतोय ३५० मजदूरांची मदत