आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी, वनडे व टी२० सामने खेळवले जातात. यात कसोटी क्रिकेटचे महत्त्व अनन्यसाधारण राहिले आहे. आता तर क्रिकेटच्या या प्रकाराची चॅम्पियनशीपही सुरु झाली आहे. त्यामुळे एक वेगळीच मजा या क्रिकेटच्या प्रकारात आली आहे.
क्रिकेटच्या या प्रकारात पदार्पणातच शतक करणे किंवा डावात ५ विकेट घेणे ही अन्य कोणत्याही प्रकारापेक्षा महत्त्वाची गोष्ट समजली जाते. तसं पाहिलं तर पदार्पणाचे दडपण, वय तसेच क्रिकेटचा सर्वात महत्त्वाचा प्रकार यामुळे अशी कामगिरी करणे तसेही मोठे कठीण असते.
परंतु जगातील दोन असे खेळाडू आहे ज्यांनी कसोटी पदार्पणाच्या सामन्यात दोन्ही डावात शतकी खेळी केली आहे. या दोन खेळाडूंबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. Cricketers to score century in both innings of debut test match.
२. यासीर हमीद (२७५ धावा)
पाकिस्तानचा माजी फलंदाज यासीर हमीदने २० ऑगस्ट २००३ रोजी कराची येथे बांगलादेशविरुद्ध कसोटी पदार्पण केले. यात त्याने पहिल्याच कसोटी सामन्यात दोन्ही डावात शतकी खेळी केली. अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला होता. आजही तो विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याने पहिल्या डावात १७० व दुसऱ्या डावात १०५ धावांची खेळी केली होती. यामुळे त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने २७५ धावा केल्या होत्या. पुढे २५ कसोटी सामने खेळलेल्या यासीर हमीदला कधीही कसोटीत शतकी खेळी करता आली नाही.
१. लाॅरेन्स रोव (३१४ धावा)
वेस्ट इंडिजचे माजी फलंदाज लाॅरेन्स रोव यांनी न्यूझीलंडविरुद्ध किंग्जस्टन जमैका येथे १६ फेब्रुवारी १९७२ रोजी कसोटी पदार्पण केले. यात त्यांनी पहिल्या डावात २१४ तर दुसऱ्या डावात नाबाद १०० धावांची खेळी केली. यामुळे त्यांची पहिल्या सामन्यातील धावांची बेरीज ही ३१४ झाली. याबरोबर त्यांनी १९०३ साली टीप फाॅस्टर यांनी पहिल्याच सामन्यात केलेला ३०६ धावांचा विक्रम मोडीत काढला. कसोटीत पदार्पणात दोन्ही डावात शतकी खेळी करणारे ते जगातील तेव्हाचे पहिले फलंदाज होते. आजही पहिल्या कसोटी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या कारकिर्दीत डोळ्याच्या आजाराने व गवताच्या एलर्जीने अनेक अडचणी आल्या. यामुळे त्यांना केवळ ३० कसोटी सामने खेळता आले. त्यात त्यांनी एकूण ७ शतके केली.
गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-
–गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १९: पाकिस्तानला नेहमीच घाम फोडणारा वेंकटेश प्रसाद
–गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १७: धोनी आधी पदार्पण करुनही १४ वर्षांचा वनवास पाहिलेला दिनेश कार्तिक
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १६: राजेशाही घराण्यातूनच क्रिकेटचा वारसा घेऊन आलेला अजय जडेजा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १५: शंभर कसोटी सामन्यांच्या उंबरठ्यावर असणारा इशांत शर्मा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज अनिल कुंबळे
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
– गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण