वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 16व्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामने-सामने असणार आहेत. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता खेळला जाणार आहे. एकीकडे सलग तीन सामने जिंकणाऱ्या न्यूझीलंड संघाचा आत्मविश्वास गगनाला भिडला आहे, तर अफगाणिस्तान संघाने मागील सामन्यात इंग्लंडला पराभूत करून स्पर्धेतील मोठा उलटफेर केला आहे. अशात चेपॉकच्या मैदानावर अफगाणिस्तानची फिरकी गोलंदाजी न्यूझीलंडला चांगलेच आव्हान देताना दिसेल.
न्यूझीलंड संघाच्या मागील सामन्यादरम्यान कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) याच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तो आगामी सामन्यातून बाहेर पडला आहे. त्यामुळे टॉम लॅथम (Tom Latham) पुन्हा एकदा संघाची धुरा सांभाळताना दिसेल. विश्वचषक आणि वनडे क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान संघ आतापर्यंत फक्त 2 वेळा आमने-सामने आले आहेत. यामध्ये दोनही वेळा न्यूझीलंड संघ विजयी झाला आहे. मात्र, गतविजेत्या इंग्लंडला पराभूत केल्यामुळे अफगाणिस्तानचाही आत्मविश्वास गगनाला भिडला आहे. अशात न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तान संघ पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटला हैराण करण्यासाठी सज्ज असेल.
चेन्नईची खेळपट्टी
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमची खेळपट्टी संथ आणि फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरत आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात फिरकी गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला होता. तसेच, आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या संघाने सामना आपल्या नावावर केला आहे.
दुसरीकडे, या मैदानाविषयी बोलायचं झालं, तर इथे आतापर्यंत 36 वनडे सामने खेळले गेले आहेत. यातील 17 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने, तर 18 सामन्यात आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. येथे सर्वोच्च धावसंख्येचा सामना पाहायला मिळत नाही. वनडेत चेपॉक मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या 224 आहे, तर दुसऱ्या डावातील सर्वोच्च धावसंख्या 206 आहे.
सामन्याचे थेट प्रक्षेपण
भारतीय प्रमाणवेळेनुसार, या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. तसेच, नाणेफेक 1.30 वाजता होईल. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल. तसेच, सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग डिझ्नी प्लस हॉटस्टार ऍपवर पाहता येईल. (cwc 2023 16th match nz vs afg preview weather and live stream know all here)
हेही वाचा-
बिग बॉस विजेता MC Stanने घेतली धोनीची भेट; नेटकरी म्हणाले, ‘हात जोडून विनंती…’
नेदरलँड्सने भारताला दिलं मोठं गिफ्ट, दक्षिण आफ्रिकेला हरवून बदलून टाकलं Points Tableचं गणित; वाचाच