दिव्यांग मुलांना सायकल चालवताना बघून स्फूर्ती मिळाली : शर्मिष्ठा राऊत

नाशिक । नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन, बजाज स्टील इंडस्ट्रीज आणि स्मार्ट सिटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्मार्ट सिटीची स्मार्ट सवारी नाशिक पेलेटॉन 2020 – 80 किमीच्या टीम चॅलेंज स्पर्धेमध्ये पुरूष गटात (वय 40 व त्यापुढील) माणिक निकम आणि समीर मराठे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

तर नितीन डहाके व हिरामण अहिरे यांनी द्वितीय तर संतोष पवार व अजीत कुलकर्णी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्याचबरोबर 80 किमी टीम चॅलेंज लोकल नाशिक पुरूष गटात (वय 40 व त्यापुढील) समीर मराठे व माणिक निकम यांनी प्रथम क्रमांक तर, दिनकर पाटील व महेंद्र महाजन द्वितीय क्रमांकावर राहिले.

शनिवार व रविवार (15 व 16 फेब्रुवारी) दोन दिवस ही पेलेटॉन स्पर्धा घेण्यात आली. दरवर्षी सांघिक प्रकारात घेण्यात येणारी पेलेटॉन स्पर्धा यावेळी सांघिक तसेच वैयक्तिक प्रकारात घेण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर रस्ता, जव्हार रस्त्यावरील गणेशखिंड, पिंपळद, गिरणारे रोड अशा निसर्गरम्य वातावरणातील मार्गावरून ही स्पर्धा पार पडली. एकूण स्पर्धेत 1500 हुन अधिक सायकलस्वारांनी सहभाग घेतला.

सर्व विजेत्यांचा प्रसिद्ध सिने अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत, बजाज स्टील इंडस्ट्रीजचे जनरल मॅनेजर केवल टेंभरे, ठक्कर्स प्रॉपर्टीजचे राजुभाई ठक्कर, स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थविल, जसपालसिंग विर्दी यांचे आजोबा गुरुदेवसिंग विर्दी, एपेक्स हॉस्पिटल्सचे शैलेंद्र बोंदार्डे, नाशिक जिल्हा सायकलिंग संघटनेचे सचिव नितीन नागरे, मनोज ट्रेडर्सचे मनोज अग्रवाल, नाशिक सायक्लिस्टसचे अध्यक्ष रत्नाकर आहेर, पेलेटॉन रेस डायरेक्टर मितेन ठक्कर यांच्या हस्ते प्रमाणपत्र, चषक आणि रोख रक्कम अशा स्वरूपाचे पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत यांनी दिव्यांग मुलांना सायकल चालवताना बघून स्फूर्ती मिळाल्याचे सांगितले. त्यांना बघून आपण रोजच्यापेक्षा वेगळे काहीतरी नक्कीच करू शकतो, बदल घडवू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पेलेटॉन बरोबरच स्मार्ट सिटी व नासिक महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील नागरिक व मुलांसाठी स्मार्ट सिटीची स्मार्ट सवारी आयोजित करण्यात आली होती. जवळपास 500 हेक्सी सायकलवरून स्पर्धकांनी राईड करत सायकल चालवण्याचा तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

सकाळी सहा वाजता नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे साहेब व मविप्र समाजाच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार, स्मार्ट सिटीचे स्मार्ट सिटीचे प्रकाश थविल यांच्या उपस्थितीत झेंडा दाखवून शर्यतींना सुरुवात करण्यात आली.

तर सकाळी नऊ वाजता पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या उपस्थितीत दिव्यांगांसाठीची स्मार्ट सिटीची स्मार्ट सवारीत सायकल रॅली पेलेटॉन दरम्यान या विविध सायकल रॅली करताना नाशिक शहरातील विविध शाळातील विद्यार्थी व पालक व सर्वसामान्य नागरिक यांनी हिरीरीने भाग घेतला. सकाळी नाशिक शहर सायकलमय झालेले दिसले. दहा वाजता सदरील स्मार्ट वारीचा समारोप ठक्कर डोम येथे झाला.

यावेळी नाशिक सायक्लिस्टस फाऊंडेशनचे सदस्य सरचिटणीस नंदकुमार पाटील, उपाध्यक्ष श्रीकांत जोशी, खजिनदार योगेश शिंदे, शैलेश राजहंस, ऍड वैभव शेटे, विशाल उगले, नीता नारंग, डॉ. मनीषा रौदळ, आदी सदस्य उपस्थित होते.

2019 या वर्षाची एनआरएम टीम तसेच गेल्या महिन्यात डॉ. आबा पाटील यांच्या नेतृत्वात पानिपत ते नाशिक साहस मोहीम पूर्ण करत विशेष कामगिरी करणाऱ्या नाशिक सायकलिस्टसचा सन्मान करण्यात आला.

स्पर्धेतील निकाल असे :

80 किमी टीम चॅलेंज (वय 40 व त्यापुढील)
प्रथम : माणिक निकम आणि समीर मराठे
द्वितीय : नितीन डहाके व हिरामण अहिरे
तृतीय : संतोष पवार व अजीत कुलकर्णी

80 किमी टीम चॅलेंज लोकल नाशिक पुरूष गट (वय 40 व त्यापुढील)
प्रथम : समीर मराठे व माणिक निकम
द्वितीय : दिनकर पाटील व महेंद्र महाजन

15 किमी (14 ते 17 वयोगट मुले)
प्रथम : वेद बोरकर
द्वितीय : सिद्धार्थ दवंडे
तृतीय : ओम कारंडे

15 किमी (14 ते 17 वयोगट मुले स्थानिक)
प्रथम : संदेश मोकळ
द्वितीय : अनुज उगले
तृतीय : कृष्णा शेट्ये

15 किमी (14 ते 17 वयोगट मुली)
प्रथम : प्रिया डबालिया

50 किमी (18 ते 39 वयोगट पुरुष)
प्रथम : सुदर्शन देवरडकर
द्वितीय : अभिनंदन भोसले
तृतीय : दिलीपनराज एन.

50 किमी (18 ते 39 वयोगट पुरुष प्राईम)
प्रथम : संरेज शेंडेकर

50 किमी (18 ते 39 वयोगट पुरुष नाशिक)
प्रथम : साहिल देव
द्वितीय : सुनील पाटील
तृतीय : निलेश झंवर

50 किमी (18 ते 39 वयोगट महिला)
प्रथम : अनुजा उगले

50 किमी (40+ वयोगट पुरुष)
प्रथम : नितीन ढाके, यवतमाळ
द्वितीय : अजित कुलकर्णी, पुणे
तृतीय : संतोष पवार

50 किमी (40+ वयोगट पुरुष नाशिक)
प्रथम : रहीम हकीम
द्वितीय : माणिक निकम
तृतीय : दिनकर पाटील

You might also like