आयपीएल 2021 च्या हंगामाला सुरूवात होण्यास जास्त कालावधी राहिलेला नाही. 9 एप्रिलपासून मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्याने या हंगामाची सुरुवात होणार आहे. यापूर्वी 18 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे आयपीएल 2021 चा लिलावही पूर्ण झाला आहे. पण या दरम्यानच्या काळात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
अलीकडे आयपीएलच्या तुलनेत पाकिस्तान सुपर लीग आणि श्रीलंका प्रीमियर लीगविषयी केलेल्या वक्तव्यानंतर डेल स्टेन हा भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या निशाण्यावर आला होता. यानंतर पुन्हा एकदा तो आयपीएलमधील आपल्या आवडत्या संघाच्या केलेल्या वक्तव्याबद्दल भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
मुंबई इंडियन्यला आवडता संघ म्हणून निवडले
आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना डेल स्टेनने आयपीएलमधील आपल्या आवडत्या संघाच्या संदर्भात एक नवीन खुलासा केला आहे. याबरोबरच स्टेनने त्याचाच सर्वोत्तम सहकारी आणि यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक याचे आवडता क्रिकेटपटू म्हणून कौतुक केले आहे. तसेच डी कॉकमुळे तो मुंबईच्या टीमला मनापासून मानत असल्याचे त्याने सांगितले आहे.
स्टेन म्हणाला की, “मला सर्व संघांची कामगीरी चांगली दिसत आहे. पण 5 वेळा विजेता ठरलेला मुंबई इंडियन्स संघ बाकीच्या संघांपेक्षा बलाढ्य असल्याचे दिसते. वैयक्तिकरित्या मला क्विंटन डी कॉकचा खेळ आवडतो म्हणून मी त्याचे समर्थन करतो. अर्थातच आयपीएलमधील माझा आवडता संघ इतर कोणता नाही तर रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स हा संघ आहे.”
वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल 2021 मधून बाहेर
विशेष म्हणजे यावर्षी होणार्या आयपीएल 2021 मधून स्टेनने वैयक्तिक कारणांमुळे खेळण्यास असमर्थता दर्शविली आहे. गेल्यावर्षी दुबईत खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या 13 व्या सत्रात तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळत होता. परंतु मागील हंगामात त्याची कामगिरी चांगली झाली नव्हती.
स्टेनने आपल्या पीएसएल-आयपीएलच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली
आयपीएलची पाकिस्तान सुपर लीगशी तुलना करण्याबाबतच्या वादात अडकल्यानंतर स्टेनने त्यांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. “आयपीएल हा माझ्या कारकीर्दीचा एक महत्त्वाचा भाग आहे. फक्त माझ्याच नाही तर इतर खेळांडूचाही आहे. मला या प्रतिष्ठित लीगचे अवमूल्यन करायचे आहे, असा माझा कोणताही हेतू नव्हता.” असे त्याने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
अन् अचानक वातावरण तापलं! वाद घालण्यासाठी कोहलीची बटलरच्या दिशेने धाव, पाहा पूर्ण प्रकरण
मोठ्या मनाचा बोल्ट! सामनावीर पुरस्कारावेळी मिळालेले तब्बल ५०० डॉलर्स केले होम क्लबला दान
आयपीएल २०२१ हंगामात हा खेळाडू करणार दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्त्व