ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू एलिसा पेरी जगातील सर्वात प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू आहे. 3 नोव्हेंबर 1990 ला सिडनीमध्ये जन्मलेल्या पेरीने क्रिकेट जगतात अनेक मोठे कारनामे आपल्या नावावर केले आहेत. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 100 विकेट्स आणि 1000 धावा करणारी जगातील पहिली महिला क्रिकेटपटू आहे. शालेयवयीन काळात पेरी टेनिस, टच फुटबॉल, गोल्फ यांसारखेही खेळ खेळली आहे.
पेरी (Ellyse Perry) 9 वर्षांच्या वयातच एलिसा हेलीची (Ellyse Healy) मैत्रीण बनली होती. हेली हे देखील महिला क्रिकेटमधील मोठे नाव आहे. 2007 मध्ये पेरीने ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पेरीने वयाच्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. मजेशीर गोष्ट अशी, की 16 वर्षांच्या वयात तिने ऑस्ट्रेलियाच्या महिला फुटबॉल संघातही स्थान मिळविले होते. त्यानंतर अनेक वर्षांपर्यंत ती दोन्ही संघांकडून खेळत होती. तरीही त्यानंतर तिने क्रिकेटमध्येच आपली कारकिर्द घडविण्याचा निर्णय घेतला.
Really enjoyed our time in Baroda, both on and off the field. The crowd and support was absolutely brilliant and it was great to see and experience some Gujarati culture #incredibleindia pic.twitter.com/5IWgtqjvGR
— Ellyse Perry (@EllysePerry) March 19, 2018
2017मध्ये तिला आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ द इयरही निवडण्यात आले होते. मागील वर्षी जुलैमध्ये ती जवळपास 4 वर्षांनंतर बाद झाली होती. इंग्लंडविरुद्ध ऍशेस कसोटीत पेरी 116 धावा करत बाद झाली होती. तसेच, त्यामध्येही इतिहास रचला गेला.
Back for a new season with the @SouthernStars! And with some new broadcast partners in @FOXSportsAUS and @Channel7. Can’t wait ???? pic.twitter.com/yYoJVlWAeC
— Ellyse Perry (@EllysePerry) May 28, 2018
कारण ती यापूर्वी पहिल्या कसोटी क्रिकेटमध्ये 2015 साली बाद झाली होती. त्यानंतर 3 वर्षे, 11 महिने आणि 6 दिवसांमध्ये तिने 655 चेंडूंचा सामना केला आणि 329 धावा केल्या. खरंतर मागील 4 वर्षांपासून तिचा तो तिसराच कसोटी सामना होता.
Long weekend of hangs with these guys @SouthernStars pic.twitter.com/Ej2FqWCySe
— Ellyse Perry (@EllysePerry) July 8, 2018
पेरीने यावर्षी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) आपल्या गोलंदाजीवर 6 चेंडू खेळण्याचे आव्हान दिले होते. त्यानंतर सचिनने ते आव्हान स्विकारले. सचिन ऑस्ट्रेलियामध्ये लागलेल्या आगीत निधी जमा करण्यासाठी मेलबर्नला गेला होता.
I’ve had quite a few people asking questions via Facebook/Twitter lately. If you have something you’d like to know, particularly in relation to cricket, training or sport in general then send me a tweet using the hashtag #AskEllyse – on Sunday I’ll select 10 questions to reply! pic.twitter.com/6ouybprmaz
— Ellyse Perry (@EllysePerry) January 10, 2018
पेरी जितके आपल्या खेळामुळे चर्चेत असते, तितकेच ती आपल्या सुंदरतेसाठीही चर्चेत असते. पेरीचे चाहते तर चक्क अनेक क्रिकेटपटूही आहेत. काही काळापूर्वी भारतीय संघाचा क्रिकेटपटू मुरली विजयने (Murali Vijay) तिच्याबरोबर डिनर डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तो म्हणाला होता, “पेरी खूप सुंदर आहे.”
पेरीने आतापर्यंत 8 कसोटी सामने, 112 वनडे सामने आणि 120 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यात तिने कसोटीत 78 च्या सरासरीने 624 धावा केल्या आहेत. वनडेत तिने 52.10 च्या सरासरीने 3022 धावा केल्या आहेत. तसेच, टी20त 28.32 च्या सरासरीने 1218 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त गोलंदाजी करताना तिने कसोटीत 31 विकेट्स, वनडेत 152 विकेट्स आणि टी20त 114 विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-सचिन तेंडूलकर विरुद्ध राहुल द्रविड: शेवटी याचं उत्तर मिळालंच, पहा कोण आहे मोठा क्रिकेटर
-क्रिकेट विश्वविजेत्या भारताच्या ट्राॅफी नक्की आहेत तरी कुठं?
-१९८३च्या कपिल देव आणि २०१७च्या हरमनप्रीत कौर यांच्या खेळीतील साम्य !