लाॅर्ड्स | शनिवारी भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या वनडेत इंग्लंडचा कर्णधार इयान माॅर्गनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याबरोबर त्याने एक खास विक्रमही केला.
इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेण्याची ही गेल्या ४० वनडेतील पहिलीच वेळ होती. यापुर्वी ७ आॅक्टोबर २०१६ला मीरपूर वनडेत नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा संघाचा कर्णधार जाॅश बटलर होता.
तर कर्णधार इयान माॅर्गनने यापुर्वी नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ३० आॅगस्ट २०१६ला घेतला होता. या सामन्यात पाकिस्तानविरु्ध इंग्लंडने ३ बाद ४४४ धावा केल्या होत्या.
थोडक्यात ३० आॅगस्ट २०१६ पासून इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकल्यावर केवळ तिसऱ्यांदा आज प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे पहिले दोन सामने इंग्लंड संघ जिंकला आहे.
माॅर्गनने ८५ सामन्यात इंग्लंड संघाचे नेतृत्व केले असून ३७वेळा तो नाणेफेक जिंकला आहे. त्यात त्याने १४वेळा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या १४ पैकी ५ सामन्यात इंग्लंडला विजय मिळवता आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-फिफा विश्वचषक: तिसऱ्या स्थानासाठी बेल्जियम – इंग्लंड आज लढणार
-भारताला वनडे मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी