आशिया चषक 2023 स्पर्धेचा कुंभमेळा सुरू होण्यासाठी अवघ्या 4 दिवसांचा कालावधी उरला आहे. 30 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणाही झाली आहे. आशिया चषकासाठी निवडल्या गेलेल्या 17 सदस्यीय भारतीय संघात केएल राहुल आणि श्रेयस अय्यर या दोन हुकमी एक्क्यांची जोडगोळी परतली आहे. तसेच, दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल यांना संघातून बाहेर काढले आहे. त्यामुळे या भारतीय संघातून विश्वचषकासाठी निवडल्या जाणाऱ्या 15 सदस्यीय संघाची झलक स्पष्टपणे दिसत आहे. अशातच भारताच्या माजी कर्णधाराने आपला 15 सदस्यीय भारतीय संघ निवडला आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने माध्यमांशी बोलताना आपला आवडता 15 सदस्यीय भारतीय संघ निवडला आहे. चला तर, गांगुलीने विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेसाठी भारतीय संघात कोणत्या शिलेदारांना जागा दिली आणि कोणाला दुर्लक्षित केले पाहूयात.
गांगुलीने विश्वचषकासाठी निवडला आवडता 15 सदस्यीय भारतीय संघ
खरं तर, गांगुलीने 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केलीये, पण त्यात संजू सॅमसन (Sanju Samson), तिलक वर्मा (Tilak Varma), युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) , आर अश्विन (R Ashwin) यांसारख्या स्टार खेळाडूंना जागा दिली नाहीये. गांगुलीने आपल्या आवडत्या संघात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांना सलामीची जबाबदारी दिली आहे. मधल्या फळीत त्याने ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर यांना संघात निवडले आहे.
यासोबतच त्याने वेगवान गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्यावर सोपवली आहे. याव्यतिरिक्त फिरकी गोलंदाजी विभागात कुलदीप यादव आणि अक्षर पटेलला घेतले आहे. यात जडेजाचाही समावेश आहे.
गांगुलीने विश्वचषकासाठी निवडलेला भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर. (former captain Sourav Ganguly Picks 15 Indian Team Squad for World Cup 2023 know here)
हेही वाचा-
ऐतिहासिक दिवस! भारतीय महिला अंध क्रिकेट संघाची कौतुकास्पद कामगिरी, ऑस्ट्रेलियाच्या नांग्या ठेचत गाठली फायनल
जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये फायनल! विजेतेपदासाठी नीरज आणि अरशदमध्ये टक्कर