भारतीय क्रिकेट संघातील मुख्य फलंदाजांमध्ये केएल राहुलचा समावेश केला जातो. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये अर्धशतकी आणि त्यानंतर शतकी खेळी करत त्याने चमकदार कामगिरी दाखवली. याबरोबरच त्याने दाखवून दिले की त्याला धावा काढण्यापासून अधिक दिवस रोखणे कठीण आहे. त्याने क्रिकेटच्या प्रत्येक स्वरूपात चांगली कामगिरी करत स्वत:ला सिद्ध केले आहे.
परंतु भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने म्हटले आहे की, केएल राहुलला मर्यादित स्वरुपात महान फलंदाज बनविण्यात संघाचा कर्णधार विराट कोहलीचा सर्वात मोठा हात आहे.
क्रिकबझशी बोलताना सेहवाग म्हणाला की, “केएल राहुलने क्रिकेटच्या प्रत्येक स्वरूपामध्ये चांगली फलंदाजी केली आहे आणि तो त्याच्या कर्णधाराचा सर्वात आवडत्या फलंदाजांपैकी एक आहे. संघाच्या कर्णधाराने योग्यवेळी फलंदाजीसाठी त्याचा उपयोग केला आहे. जेव्हा एखादा नवीन खेळाडू संघात खेळण्यासाठी येतो तेव्हा त्याला उत्कृष्ट अकरामध्ये ठेवणे गरजेचे असते.”
तसेच सेहवाग म्हणाला की, “तो 11 व्या क्रमांकावर जरी खेळत नसला तरी आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण त्याला तिथे खेळवू शकता. त्याला महान फलंदाज बनविण्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीची खूप मोठी भूमिका आहे.”
“सलामीवीर फलंदाजासाठी पहिली दहा षटके खूपच कठिण असतात आणि यामध्ये आपल्या स्वतःसाठी फलंदाजाला कमी वेळ मिळत असतो. जेव्हा मी सलामी फलंदाजी करायला जात असे, तेव्हा मी पहिल्या दहा षटकांत गोलंदाजांवरती प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करायचो. विराट कोहलीने केएल राहुलवर दाखविलेल्या आत्मविश्वासामुळे तो आज इतका महान फलंदाज बनू शकला आहे,” असे शेवटी सेहवागने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvENG: विराट, रोहित आणि रिषभमध्ये धावांसाठी जबरदस्त चढाओढ, अखेर ‘हा’ फलंदाज ठरला अव्वल
सातासमुद्रापार रिषभ पंतच्या ‘रिव्हर्स स्कूप’चा जलवा; व्हिडिओ पाहून म्हणाल, सेम टू सेम!
INDvENG: पावरप्लेत पहिल्यांदाच २ विकेट्स ते फलंदाजांची आतषबाजी; वाचा भारताच्या विजयाची प्रमुख कारणे