मुंबई | प्रो कबड्डी २०१८चे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. या जाहीर केलेल्या वेळापत्राकानुसार १२ संघांचे हे सामने १३ स्टेडियमवर होणार आहेत.
७५ दिवस चालणाऱ्या या कबड्डीच्या महाकुंभाची सुरुवात चेन्नई लेगने ५ आॅक्टोबरला होणार असुन फायनल आणि प्ले आॅफचा शेवटचा सामना मुंबईत होणार आहे.
पुणे लेग हा या हंगामातील चेन्नई आणि सोनीपतनंतरचा तिसरा लेग असुन याची सुरुवात हा लेग १९ ते २५ आॅक्टोबर चालेल.
तर मुंबई लेग हा स्पर्धेतील ९ ते १५ नोव्हेंबर या काळात होणार आहे. यावेळी कोची येथे दोन प्ले आॅफचे ४ (क्वाॅलिफायरचे ३ आणि १ इलिमीनेटरचा ) सामने ३० आणि ३१ डिसेंबर रोजी होणार आहेत. तर तिसरा प्ले आॅफ (इलिमीनेटर २) ३ जानेवारी असुन शनिवार, ५ जानेवारी २०१९ला फायनल सामना मुंबईत होणार आहे.
असे आहे वेळापत्रक-
चेन्नई लेग- ५ ते ११ आक्टोबर २०१८
सोनीपत लेग- १२ ते १८ आॅक्टोबर २०१८
पुणे लेग- १९ ते २४ आॅक्टोबर २०१८, इंटरझोन विक
पाटना लेग- २६ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर २०१८, इंटरझोन विक
युपी, नोयडा लेग- २ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर २०१८
मुंबई लेग- ९ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०१८, इंटरझोन विक
अहमदाबाद लेग- १६ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०१८, इंटरझोन विक
बेंगलुरु लेग- २३ नोव्हेबर ते २९ नोव्हेंबर २०१८
दिल्ली लेग- ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०१८, इंटरझोन विक
हैद्राबाद लेग- ७ डिसेंबर ते १३ डिसेंबर २०१८, इंटरझोन विक
जयपुर लेग- १४ डिसेंबर ते २० डिसेंबर २०१८
कोलकाता लेग- २१ डिसेंबर ते २७ डिसेंबर २०१८, वाईल्ड कार्ड विक
कोची लेग- ३० डिसेंबर २०१८, पहिला क्वाॅलिफायर १ आणि २ आणि ३१ डिसेंबर क्वाॅलिफायर ३ आणि इलिमीनेटर १
मुंबई लेग- ३ जानेवारी २०१९, इलिमीनेटर २ आणि ५ जानेवारी फायनल
1⃣3⃣ venues
1⃣2⃣ teams
7⃣5⃣ days of action-packed kabaddi Here's how the #kabaddi bandwagon will take over the country come #ProKabaddi Season 6! pic.twitter.com/GfMnM4dPw9— Khel Kabaddi (@KhelKabaddiNews) August 22, 2018
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–भारतीय वेगवान गोलंदाजांनी रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास
–विराट कोहलीने गांगुलीला टाकले मागे, धोनीचा विक्रम धोक्यात