येत्या ९ एप्रिलपासून इंडियन प्रीमियर लीग म्हणजे आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. आयपीएल गवर्निंग काउंलिसने या हंगामाचे वेळापत्रक मागील महिन्यात घोषित केले आहे. आयपीएल २०२१ चा पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात चेन्नई येथे पार पडणार आहे.
आयपीएलमधील यशस्वी संघांपैकी एक असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने आत्तापर्यंत आयपीएलचे ३ वेळा विजेतेपद जिंकले आहे. एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई संघ गतवर्षी खास कामगिरी करू शकला नव्हता. त्यामुळे यावर्षी चेन्नईचा संघ दमदार पुनरागमन चौथे जेतेपद जिंकण्याच्या इराद्याने खेळेल.
अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या चेन्नईच्या या हंगामातील एकूण १४ सामन्यांपैकी १२ सामने रात्री ७.३० वाजता होतील. तर उर्वरित २ सामने दुपारी ३.३० वाजता होतील. १० एप्रिल रोजी मुंबईत युवा खेळाडूंनी भरलेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चेन्नईची पहिली लढत होईल.
आयपीएलचा हा चौदावा हंगाम यावर्षी ५१ दिवसांचा असणार आहे. ९ एप्रिल ते २३ मेपर्यंत या हंगामातील साखळी सामने पार पडतील. त्यानंतर २५ मे पासून प्लेऑफचे सामने सुरु होतील. ३० मे रोजी या हंगामाचा अंतिम सामना होईल. तसेच यावर्षी आयपीएलमध्ये ११ डबल हेडर (एका दिवसात दोन सामने) होणार आहेत. डबल हेडरच्या दिवशी दुपारचे सामने ३.३० वाजता सुरु होतील आणि संध्याकाळचे सामने ७.३० वाजता सुरु होतील.
All set for the Whistles?! #Yellove Summer from April 10th onwards! #WhistlePodu #IPL2021 💛🦁 pic.twitter.com/OZfGIyNTVt
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 7, 2021
असे आहेत आयपीएल २०२१ मधील चेन्नई सुपर किंग्सचे साखळी फेरीतील सामने-
१० एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मुंबई, संध्याकाळी ७.३० वाजता
१६ एप्रिल – पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई, संध्याकाळी ७.३० वाजता
१९ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, मुंबई, संध्याकाळी ७.३० वाजता
२१ एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई, संध्याकाळी ७.३० वाजता
२५ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई, दुपारी ३.३०
२८ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली, संध्याकाळी ७.३० वाजता
१ मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली, संध्याकाळी ७.३० वाजता
५ मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली, संध्याकाळी ७.३० वाजता
७ मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली, संध्याकाळी ७.३० वाजता
९ मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज, बंगळुरू, दुपारी ३.३० वाजता
१२ मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, बेंगलोर, संध्याकाळी ७.३० वाजता
१६ मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, बंगळुरू, संध्याकाळी ७.३० वाजता
२१ मे- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता, संध्याकाळी ७.३० वाजता
२३ मे – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता, संध्याकाळी ७.३० वाजता
चेन्नई सुपर किंग्स – २५ खेळाडू (७ परदेशी)
एमएस धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर, नारायण जगदीसन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सँटनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, आर साई किशोर, सॅम करन, रॉबिन उथप्पा, कृष्णप्पा गौतम, मोईन अली, चेतेश्वर पुजारा, के भागवथ वर्मा, सी हरी निशांथ, एम हरिशंकर रेड्डी
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई विरुद्ध बेंगलोर सामन्याने होणार आयपीएल २०२१ ची सुरुवात, पाहा संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल २०२१चे सामने तुम्ही स्टेडियममध्ये पाहू शकता? पाहा काय घेतलाय बीसीसीआयने निर्णय