आजपासून(25 जूलै) ग्लोबल टी20 लीग स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना टोरोंटो नॅशनल्स विरुद्ध व्हँकुव्हर नाइट्स संघात होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10 वाजता सुरुवात होणार आहे.
या स्पर्धेत टोरोंटो नॅशनल्स संघाचे नेतृत्व युवराज सिंग करणार आहे. तर नाईट्सचे नेतृत्व ख्रिस गेल करणार आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून हे दोन्ही स्पोटक फलंदाज आज आमने सामने येणार आहेत.
युवराजने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि बीसीसीआयच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्ती घेतानाच त्याने तो परदेशी लीग स्पर्धेत खेळणार असल्याचे स्पष्ट केले होते.
युवराज नेतृत्व करणार असलेल्या टोरोंटो संघात ब्रेंडन मॅक्यूलम, किरॉन पोलार्ड, मिशेल मॅक्लेनघन, हेन्री क्लासेन असे काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळलेले खेळाडू आहेत. तर ख्रिस गेल नेतृत्व करत असलेल्या नाईट्स संघात शोएब मलिक, आंद्रे रसल, टिम साऊथी, रसी वॅन दर दसन असे काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळलेले खेळाडू आहेत.
या स्पर्धेत एकूण टोरोंटो नॅशनल्स, व्हँकुव्हर नाइट्स, विनीपेग हॉक्स, मॉन्ट्रियल टाइगर्स, एडमंटन रॉयल्स, ब्रॅम्पटन वोल्व हे सहा संघ खेळणार आहेत. ब्रॅम्पटन वोल्व हा या स्पर्धेत सामील झालेला नवीन संघ आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 11 ऑगस्टला होणार आहे.
ही स्पर्धा स्टार नेटवर्कवर चाहत्यांना लाईव्ह पाहता येणार आहे.
असे आहेत टोरोंटो नॅशनल्स आणि व्हँकुव्हर नाइट्स संघ –
व्हँकुव्हर नाइट्स: ख्रिस गेल (कर्णधार), शोएब मलिक, आंद्रे रसल, टीम साऊथी, रसी वॅन दर दसन, चाडविक वॉल्टन (यष्टीरक्षक), डॅनियल सॅम्स, हेडन वॉल्श, जे जे स्मिथ, मॅथ्यू नंदू, टोबियास व्हिसे, मायकेल रिप्पॉन, अली खान, साद बिन जाफर, रिजवान चीमा, रायन पठाण, हर्ष ठाकर
टोरोंटो नॅशनल्स: ब्रँडन मॅककुलम, युवराज सिंग (कर्णधार), किरॉन पोलार्ड, हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), मनप्रीत गोनी, ख्रिस ग्रीन, कॅलम मॅकलोद, चिराग सूरी, गुलाम शॅबर, जेरेमी गॉर्डन, रविंदरपाल सिंग, सलमान नझार, रॉड्रिगो थॉमस , मार्क मोंटफोर्ट, मिशेल मॅक्लेनघन.
Pre-tournament battle between @YUVSTRONG12 @henrygayle Who do you think will hit the biggest 6? Action kicks off Thursday 25th. #GT2019 #VKvTN pic.twitter.com/2sQs9A5VZq
— GT20 Canada (@GT20Canada) July 24, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–२०११ विश्वचषकात ज्याच्या चेंडूवर धोनीने मारला होता विजयी षटकार तो होतोय निवृत्त
–प्रो कबड्डीत हा मोठा पल्ला पार करणारा तेलुगू टायटन्स केवळ दुसराच संघ
–टेस्ट चॅम्पियनशीप: टीम इंडिया ७ क्रमांकाच्या जर्सीबाबत घेणार हा निर्णय?