इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी आयपीएल फ्रँचायझींमध्ये मोठे ट्रेड झाले. त्यापैकी एक म्हणजे, गुजरात टायटन्सचा नियमित कर्णधार हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात गेला. यामुळे गुजरातला चांगलाच धक्का बसला. सुरुवातीच्या दोन हंगामात संघाला सलग दोन वेळा अंतिम सामन्यात पोहोचवणाऱ्या पंड्याने यावर्षी आपला जुना संघ मुंबईकडून पुन्हा खेळण्याचा निर्णय घेतला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात पहिल्या हंगामात विजयीही बनला होता. मात्र, ऑस्ट्रेलियन दिग्गज ब्रॅड हॉग याने लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला ब्रॅड हॉग?
ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ब्रॅड हॉग (Brad Hogg) याला वाटते की, गुजरात टायटन्स हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्याशिवायदेखील आयपीएल 2024 अंतिम सामना (IPL 2024 Final) गाठू शकतो. खरं तर, हार्दिक पंड्या याचा मुंबई इंडियन्स (Mumbai India) संघासोबत ट्रेड पूर्ण झाला आहे. तसेच, गुजरात टायटन्सने शुबमन गिल (Shubman Gill) याला कर्णधार म्हणून घोषितही केले आहे.
हॉगने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून भविष्यवाणी करत म्हटले की, भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्या संघात नसतानाही गुजरात पुन्हा एकदा आयपीएल 2024 (IPL 2024) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जागा बनवू शकतो. माजी ऑस्ट्रेलियन फिरकीपटूने गुजरातच्या चाहत्यांनाही आग्रह केला आहे की, हार्दिक पुन्हा मुंबईत गेल्याने आपली फसवणूक झाल्याचे वाटून घेऊ नये.
तो म्हणाला, “गुजरात टायटन्सचे चाहते, तुम्ही यामुळे थोडे निराश असाल की, हार्दिक पंड्या पुन्हा मुंबई इंडियन्स संघात गेला आहे. त्यामुळे फसवणूक झाल्याचे वाटून घेऊ नका. त्याने तुमच्यासाठी चांगले काम केले आहे. त्याने कर्णधार म्हणून तुम्हाला दोन वेळा अंतिम सामन्यात पोहोचवले आणि त्याच्या नेतृत्वात तुम्ही एक किताबही जिंकला. मात्र, हार्दिकसाठी पैशांची मोठी देवघेव झाली आहे. मला अजूनही वाटते की, तुम्ही यावर्षी अंतिम सामन्यात पोहोचाल.”
पुढे बोलताना हॉग असे म्हणाला की, “तुम्हाला हार्दिकबद्दल वाटले पाहिजे. त्याने मुंबई इंडियन्ससोबत सुरुवात केली. तो त्यांच्यासाठी खेळू इच्छित होता. तो व्याकुळ होता की, त्याला जावे लागले. हे चांगले चरित्र दर्शवते. मात्र, तो त्या संघासाठी खेळण्यात सक्षम नव्हता, ज्यासाठी तो खेळू इच्छित होता. तरीही त्याने पुढे येऊन उच्च गुणवत्तेसह त्या संघाचे नेतृत्व केले.”
गुजरात पहिल्या हंगामाचा विजेता
हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघ आयपीएल 2022 या आपल्या पहिल्याच हंगामाचा किताब जिंकण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर आयपीएल 2023 स्पर्धेतही त्यांनी अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. मात्र, चेन्नई सुपर किंग्स संघाकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला आणि त्यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. (gujarat titans to make it to ipl 2024 final despite hardik pandya mumbai indians trade brad hogg make prediction)
हेही वाचा-
ठरलं रे! IPL 2024 Auctionची तारीख आणि ठिकाणाची अधिकृत घोषणा; पहिल्यांदाच भारताबाहेर खेळाडूंवर लागणार बोली
Video: युवराज सिंगने शेअर केला इन्स्टाग्राम विरूद्ध रिऍलिटी व्हिडिओ; सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ