भारतीय हॉकी संघाचा क्रमांक दोनचा गोलकिपर आकाश चिकटेचे नाव नॅशनल अॅंटी डोपिंग एजन्सीच्या (नाडा) यादीत आले आहे. मुख्य गोलकिपर पीआर श्रीजेश दुखापतग्रस्त होता त्यादरम्यान चिकटेचा अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांत समावेश होता.
नाडाने दिलेल्या माहितीनुसार, चिकटेबद्दलच्या डोपिंगची माहिती यावर्षीच्या 16 ऑगस्टपासून समोर आली होती. तसेच याची पुढील तपासणी सुरू आहे. चिकटेने 2016मध्ये संघात पदार्पण केले आहे.
यवतमाळच्या या खेळाडूने दुखापत झाल्यावर नाडाच्या थेरॅप्युटीक युज एक्सेप्शन (टीयुइ) सर्टीफिकेट नसलेल्या औषधांचा वापर केला होता.
या वर्षीच्या सुरूवातीस बंगळुरू येथे घेण्यात आलेल्या डोप चाचणीत हे निष्कर्ष आढळून आले होते. बंदी असलेल्या घटकांचा त्याच्या औषधात वापर केला होता हे चिकटेच्या युरीन तपासणीतून कळाले. त्या घटकाबद्दलची अधिक माहिती नाडाने दिली नाही.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-Video: शोएब मलिक आणि एमएस धोनी यांच्या सरावादरम्यान रंगल्या गप्पा
–पाकिस्तानच्या माजी खेळाडूंना भारताला नमवण्याचा विश्वास