fbpx
Tuesday, April 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयएसएल २०२०-२१: एटीके मोहन बागानने हैदराबादला रोखले

February 22, 2021
in टॉप बातम्या, फुटबॉल
0
Photo Courtesy: Twitter/IndSuperLeague

Photo Courtesy: Twitter/IndSuperLeague


गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात सोमवारी आघाडीवरील एटीके मोहन बागानने हैदराबाद एफसीला 2-2 असे बरोबरीत रोखले. बचाव फळीतील पश्चिम बंगालचा 27 वर्षीय खेळाडू प्रीतम कोटल याने हा गोल केला. पाचव्याच मिनिटाला रेड कार्डमुळे एक खेळाडू कमी होऊनही हैदराबादने दोन वेळा आघाडी घेतली होती, पण भरपाई वेळेत त्यांचा निर्णायक विजय हुकला. हा निकाल त्यांच्या बाद फेरीच्या संधीसाठी प्रतिकूल ठरला.

वास्को येथील टिळक मैदानावर हा सामना झाला. मध्यंतरास हैदराबादकडे एका गोलची आघाडी होती. पाचव्याच मिनिटाला त्यांच्या चिंगलेनसाना सिंगला रेड कार्ड मिळाले. एक खेळाडू कमी होऊनही हैदराबादने त्यानंतर तीन मिनिटांत व सामन्याच्या आठव्याच मिनिटास खाते उघडले. आघाडी फळीतील स्पेनचा 33 वर्षीय खेळाडू अरीडेन सँटाना याने हा गोल केला. मध्यंतरास हैदराबादने ही आघाडी राखली. दुसऱ्या सत्रात 57व्या मिनिटाला एटीकेएमबीला आघाडी फळीतील पंजाबचा 25 वर्षीय मानवीर सिंग याने बरोबरी साधून दिली. हैदराबादला 75व्या मिनिटाला मध्य फळीतील नेदरलँड्सचा 30 वर्षीय बदली खेळाडू रोलँड अल्बर्ग याने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर हैदराबादने एक खेळाडू कमी असूनही जिद्दीने खेळ केला होता, पण भरपाई वेळेत गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याच्या ढिलाईमुळे हैदराबादला फटका बसला.

हैदराबादने 19 सामन्यांत दहावी बरोबरी साधली असून सहा विजय व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 28 गुण झाले. त्यांचा एकच सामना बाकी आहे. त्यांचे चौथे स्थान कायम राहिले असले तरी पाचव्या क्रमांकावरील नॉर्थईस्ट युनायटेड एफसी त्याना मागे टाकू शकलो. नॉर्थईस्टचे दोन सामने बाकी आहेत. 18 सामन्यांत 27 गुण अशी त्यांची कामगिरी आहे.

एटीकेएमबीने 19 सामन्यांत चौथ्या बरोबरीची नोंद केली असून 12 विजय व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 40 गुण झाले. त्यांनी मुंबई सिटीवरील आघाडी सहा गुणांनी वाढविली. मुंबई सिटीचे दोन सामने बाकी आहेत. 18 सामन्यांत 34 गुण अशी मुंबईची कामगिरी आहे.

हैदराबादसाठी सामन्याचा प्रारंभ धक्कादायक ठरला. पाचव्याच मिनिटाला बचावपटू चिंगलेनसाना सिंग याला रेड कार्डमुळे मैदान सोडावे लागले. एटीकेएमबीचा मध्यरक्षक कार्ल मॅक्ह्यूज याने चेंडूवर ताबा मिळविला. त्याच्या पासवर फॉर्मातील स्ट्रायकर रॉय कृष्णा याने हेडिंग केले. हैदराबादचा बचावपटू ओडेई ओनैन्डीया याने हेडिंगद्वारे चेंडू रोखला, पण त्याचा बचाव अचूक नव्हता. त्यामुळे एटीकेएमबीचा स्ट्रायकर डेव्हिड विल्यम्स याने चेंडूवर ताबा मिळविण्यासाठी धावण्यास सुरवात केली. त्याने चिंगलेनसाना याला मागे टाकले. त्याचवेळी चिंगलेनसाना याने पाठीमागून ओढत त्याला पाडले. त्यामुळे रेफरी एल. अजितकुमार मैतेई यांनी चिंगलेनसानाला रेड कार्ड दाखविले.

यानंतरही हैदराबादने दडपण घेतले नाही. एटीकेएमबीचा बचावपटू प्रीतम कोटल याने हैदराबादचा चेंडू रोखला, पण तो गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य याच्याकडे मारताना त्याने ढिलाई दाखविली. याचा फायदा उठवित हैदराबादचा मध्यरक्षक हालीचरण नर्झारी याला डावीकडे चेंडूवर ताबा मिळविला. त्यावेळी एटीकेएमबीचा बचावपटू टिरी हा सुद्धा गाफील होता. सँटानाच्या असित्वाची दखल त्याने घेतली नव्हती. हे त्याच्या लक्षात आले तेव्हा उशीर झाला होता. टिरी चेंडूपाशी जाण्याआधीच सँटानाने नेटच्या दिशेने फटका मारला. त्याने ताकदवान फटका मारला होता, पण चेंडू अरींदमच्या हाताला लागून त्याच्यामागे जाऊ लागला. त्याचवेळी एटीकेएमबीचा बचावपटू शुभाशिष बोस याच्या पायाला लागून चेंडू नेटमध्ये गेला.

एटीकेएमबीने दुसऱ्या सत्रात बरोबरी साधली. 57व्या मिनिटाला हैदराबादच्या ओडेई ओनैन्डीया याचा हेडर मैदानाच्या मध्य भागी चुकला. त्यावेळी हैदराबादचा मध्यरक्षक लुईस सॅस्त्रे हा सुद्धा गाफील होता. त्यामुळे विल्यम्सने चेंडूवर ताबा मिळविला आणि मानवीरच्या साथीत चाल रचली. मानवीरने उजवीकडून मुसंडी मारली आणि शानदार फटक्यावर फिनिशींग केले. हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी गुडघ्यांत खाली वाकला, पण तो चेंडू रोखू शकला नाही.

सामन्याच्या 75व्या मिनिटाला हैदराबादचा बचावपटू आकाश मिश्रा याने थ्रो-ईनवर चेंडू फेकला. त्यावेळी गोलक्षेत्रालगत सँटानाने वेग आणि चपळाई दाखवित हेडिंग केले. त्यामुळे निर्माण झालेल्या संधीवर अल्बर्ग फिनिशींग केले. चेंडू नेटच्या उजव्या कोपऱ्यात गेला तेव्हा अरींदम काहीही करू शकला नाही. अल्बर्गला 73व्या मिनिटाला आघाडी फळीतील लिस्टन कुलासो याच्याऐवजी मैदानावर उतरविण्यात आले होते. हैदराबादचे प्रशिक्षक मॅन्युएल मार्क्वेझ यांचा हा निर्णय अचूक ठरला, ज्याचे फळ संघाला दोन मिनिटांत मिळाले.

भरपाई वेळेत एटीकेएमबीला कॉर्नर मिळाला. डावीकडे बदली मध्यरक्षक जयेश राणे याने जवळच असलेल्या विल्यम्सकडे चेंडू सोपविला. विल्यम्सने पुन्हा दिलेल्या चेंडूवर राणेने क्रॉसशॉट मारला. त्यावेळी कट्टमनीला चेंडू नीट अडविता आला नाही. त्याचवेळी कोटलने हेडिंगवर लक्ष्य गाठले.

महत्त्वाच्या बातम्या –

आयएसएल २०२०-२१: चेन्नईयीनचा एक खेळाडू कमी होऊनही ब्लास्टर्सला फायदा उठविण्यात अपयश; सामन्यात बरोबरी

आयएसएल २०२०-२१: बेंगळुरूला हरवून गोवा तिसऱ्या स्थानी

मुंबई फालकन्स संघाने रचला इतिहास, एफ ३ आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत मिळवले तिसरे स्थान


Previous Post

मुंबई फालकन्स संघाने रचला इतिहास, एफ ३ आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत मिळवले तिसरे स्थान

Next Post

“आयपीएलमध्ये न्यूझीलंडच्या खेळाडूंना डावलले जाते”, माजी क्रिकेटपटूने केला मोठा आरोप

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

दिल्ली कॅपिटल्ससाठी खुशखबर! मुंबई विरुद्धच्या सामन्याआधी ‘हा’ घातक गोलंदाज झाला फिट

April 20, 2021
Photo Courtesy: Screengrab/@RCBTweets
IPL

याला विमानातून खाली फेका रे! ‘मिस्टर नॅग्स’ची बडबड ऐकून विराटने दिला असा आदेश, पुढं काय झालं पाहा

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL.
IPL

जडेजाला मोलाचा सल्ला देत ‘कॅप्टनकूल’ने पुन्हा दाखवली नेतृत्त्वाची चुणूक, गावसकरांनी ‘या’ शब्दात केलं कौतुक

April 20, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

त्याच्यात महान टी२० फलंदाजाची चिन्हे, तो आयपीएलचा सुपरस्टार आहे; कैफने ‘या’ फलंदाजाची केली स्तुती

April 20, 2021
Photo Courtesy: Instagram/@sakariya.chetan
IPL

‘ड्रीम विकेट’ घेतल्यानंतर सकारियाची धोनीशी भेट; म्हणाला, ‘तुमच्यासारखे दुसरे कोणीही नाही’

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@IPL/@cricketaakash
IPL

‘जेव्हा सुर्यास्त होतो, तेव्हा..’ समालोचक आकाश चोप्राने धोनीबद्दल केलं असं काही भाष्य, उडाली खळबळ!

April 20, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ICC

"आयपीएलमध्ये न्यूझीलंडच्या खेळाडूंना डावलले जाते", माजी क्रिकेटपटूने केला मोठा आरोप

Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL

"धोनीच्या नेतृत्वात खेळणे म्हणजे स्वप्नपूर्ती", सीएसकेत निवड झालेल्या क्रिकेटपटूने दिली प्रतिक्रिया

कराटेपटू रोहित भोरे यांची गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.