इंग्लंडचा माजी दिग्गज क्रिकेटपटू केविन पीटरसन याने एमएस धोनीला अखेर चुकीचे ठरवलेच. मागच्या काही वर्षांमध्ये पीटरसन धोनीला मिळालेली पहिली कसोटी विकेट आहे, अशा चर्चा होत्या. पण मंगळवारी (16 मे) पीटरसनने अखेर याविषयी ट्वीट करून हे चुकीचे असल्याचे सांगितले. पीटरसनने धोनीला लक्षात आणून दिले की, 2011 साली खेळल्या गेलेल्या त्या कसोटी सामन्यात धोनीने त्याची विकेट घेतली नव्हती.
इंडियन प्रीमियर लीग 2017 मध्ये केविन पीटरसन समालोचकाची भूमिका पार पाडत होता. पीटरसनने यावेळी मनोज तिवारीसोबत चर्चा करत होता. यावेळी पीटरसनने तिवारीला धोनीजवळ जाऊन असे म्हणायला सांगितले की, “पीटरसन धोनीपेक्षा चांगला गोल्फर आहे.” यावर भारतीय संघाचा माजी कर्णधार मजेशीर उत्तर देतो. धोनीने क्षणाचाही विलंब न करता म्हटले की, “पीटरसन माझी पहिली कसोटी विकेट आहे.” धोनीच्या या वक्तव्याची माध्यमांमध्ये चांगलीच चर्चा झाली होती. सोबतच तेव्हापासून पीटरसनला अनेकदा धोनीची पहिली कसोटी विकेट म्हणूनही उल्लेखले गेले.
आता याच पार्श्वभूमीवर पीटरसनने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये त्याने धोनीचा हा दावा चुकीचा असल्याचे सांगितले. त्याने लिहिले की, “मी सतत त्या सामन्याच्या क्लीप्स (व्हिडिओ) पाहत आहे. मी सर्वांना हे सांगू इच्छितो की, हे योग्य नाही. मी धोनीची पहिली कसोटी विकेट नाहीये. मला ही गोष्ट सांगताना अजिबात चांगले वाटत नाहीये, पण मी तो (पहिली विकेट) नाहीये.”
I’m actively seeking the clip from the Test match at Lords to put to bed all these claims that I WAS Dhoni’s first Test Wicket.
I hate to break it to you – I WASN’T!— Kevin Pietersen🦏 (@KP24) May 16, 2023
दरम्यान, 2011 मध्ये भारत आणि इंग्लंडमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली होती. भारताचा वेगवान गोलंदाज जहीर खान दुखापतग्रस्त असताना स्वतः धोनी यष्टीरक्षकाची भूमिका सोडून गोलंदाजी करताना दिसला होता. इंग्लंडच्या डावातील 80व्या षटकात चेंडू पीटरसच्या बॅटला लागून यष्टीरक्षकाच्या हातात गेला आणि झेल पकडला गेला. पंच बिलि बाउंडन यांनी पीटरसनला आउट करार दिला. मात्र, पीटरसननेही रिव्यूची मागणी केली आणि तिसऱ्या पंचांनी त्याला नॉट आउट दिले. पंचांनी आपला निर्णय त्वरीत बदलला आणि नंतर पीटरसनने या सामन्यात मोठी खेळी केली. इंग्लंडने हा सामना 196 धावांनी जिंकला होता. (I am not MS Dhoni’s first Test wicket, says Kevin Pietersen)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
याला म्हणतात धाडस! धरमशालात ‘पंजाबी’ खेळाडूंचा ट्रेक, धवनचा व्हिडिओ तुफान व्हायरल
IPL 2023च्या 63व्या सामन्यात मुंबईने जिंकला टॉस, कृणालसेना करणार बॅटिंग