आयसीसी टी20 विश्वचषकातील 21वा सामना दक्षिण अफ्रिका (South Africa) विरुद्ध बांग्लादेश (Bangladesh) यांच्यामध्ये खेळला गेला. न्यूयाॅर्कमधील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला. त्यामध्ये दक्षिण अफ्रिकेनं या सामन्यात बांग्लादेशला 4 धावांनी धूळ चारली. दक्षिण अफ्रिकेनं बांग्लादेशसमोर 114 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि दक्षिण अफ्रिकेनं नासाउच्या स्टेडियमवर सर्वात कमी 113 धावसंख्येचा बचाव केला.
तत्पूर्वी दक्षिण अफ्रिका कर्णधार एडन मार्करमनं टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीची निर्णय घेतला होता. त्यामध्ये अफ्रिकेडून फलंदाजी करताना आक्रमक फलंदाज हेनरिक क्लासेननं 44 चेंडूत सर्वाधिक 46 धावा ठोकल्या. यादरम्यान त्यानं 2 चौकांसहित 3 उत्तुंग षटकार ठोकले. डेव्हिड मिलरनं 38 चेंडूत 29 धावांची खेळी खेळली. यामध्ये त्यानं 1 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर सलामीवीर क्विंटन डी काॅकनं 11 चेंडूत 18 धावांची आक्रमक खेळी खेळली आणि दक्षिण अफ्रिका 6 विकेट्स गमावून 113 धावा बनवू शकली.
बांग्लादेशसाठी तन्झिम हसन साकिबनं (Tanzim Hasan Sakib) सर्वाधिक 3 विकेट्स घेतले. तस्कीन अहमदनं (Tanzim Hasan Sakib)2 तर रिशाद हुसेननं (Rishad Hossain) 1 विकेट मिळवली.
बांग्लादेशसाठी 114 धावांचा पाठलाग करताना तौहिद ह्रदोयनं (Towhid Hridoy) 34 चेंडूत सर्वाधिक 37 धावांची खेळी खेळली. यादरम्यानं 2 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार ठोकले. महमुदुल्लानं 27 चेंडूत 20 धावांची खेळी खेळली. परंतु संघाला सामना जिंकवून देण्यात तो अयशस्वी राहिला. दक्षिण अफ्रिकेसाठी केशव महाराजनं 3 तर कगिसो रबाडा आणि एनरिक नॉर्टजे यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
दक्षिण आफ्रिका- रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एडन मार्करम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, केशव महाराज, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे, ओटनील बार्टमन
बांग्लादेश- तन्झिद हसन, जाकेर अली, लिटन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहिद ह्रदोय, शाकिब अल हसन, महमुदुल्ला, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी: देशाच्या नवीन क्रीडा मंत्रीपदी मनसुख मांडविया
दक्षिण आफ्रिकेनं जिंकला टाॅस; प्रथम फलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
दु:खद बातमी! मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन