पुढच्या महिन्यात न्यूझीलंडमध्ये आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक (ICC Women’s World Cup 2022) खेळला जाणार आहे. भारतीय संघा विश्वचषकातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानशी भिडणार आहे. महिला विश्वचषकाची सुरुवात चार मार्चपासून होईल आणि भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan Match) सामना ६ मार्चला होईल. तत्पूर्वी, पाकिस्तान महिला संघाची कर्णधार बिसमाह मारूफ (bismah maroof) हिने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. बिसमाहाला आशा आहे की, पहिल्या सामन्यात त्यांचा संघ भारताला मात देईल.
नुकतीच आई बनल्यानंतर बिसमाह विश्वचषक स्पर्धेतून क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. माध्यमांशी बोलताना ती म्हणाली, “भारत आणि पाकिस्तान सामना कोणत्याही खेळाडूसाठी स्वतःची प्रतिभा सिद्ध करण्यासाठी चांगले व्यासपीठ आहे. पण शेवटी हा एक क्रिकेटचा सामना आहे, ज्यामध्ये बेसिक्स योग्य ठेवून एका नेहमीच्या सामन्यासारखे खेळावे लागेल. हा सामना भारत आणि पाकिस्तानच्या मुलींना क्रिकेटमध्ये कारकीर्द करण्यासाठी प्रेरित करेल. ही क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा आहे आणि प्रेक्षकांच्या नजराही त्यावर लागून असतील. आशा आहे की, दोन्ही देशांमधील लाखो मुली हा सामना पाहून क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरित होतील.”
बिसमाहने यावेळी बोलताना भारतीय महिला संघाचेही कौतुक केले आणि स्वतःचा संघ चांगले प्रदर्शन करू शकेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली. ती म्हणाली, “भारतीय संघ खूप चांगला आहे, ज्यांनी नुकतेच उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. त्यांच्याकडे अनेक चांगल्या युवा खेळाडू आहेत. आमचे लक्ष पहिल्यांदाच सेमीफायनलपर्यंत पोहोचणे असेल. मला वाटते की, माझा संघ हे करू शकतो. आमच्याकडे अनुभव, गुणवत्ता आणि काही उत्कृष्ट युवा खेळाडूही आहेत.”
बिसमाह संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे आणि अशात तिच्यावर स्वतः चागले प्रदर्शन करण्याची जबाबदारीही असणार आहे. ती पुढे बोलताना म्हणाला की, “जर मी नीट खेळू शकले नाही, तर दुसऱ्यांनाही प्रेरित करू शकणार नाही. मागच्या वर्षी आम्ही चांगले प्रदर्शन करू शकलो नव्हतो आणि याविषयी आपापसात चर्चा केली आहे. खेळाडूंना माहितीय की कुठे सुधारणा करायची आहे आणि चांगले प्रदर्शन कसे करायचे आहे.”
दरम्यान, महिला विश्वचषाकपूर्वी भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिले दोन सामने खेळले गेले आहेत, ज्यापैकी एकही भारतीय संघाला जिंकता आला नाही. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने ६२ धावांनी विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघ तीन विकेट्स राखून जिंकला.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएलच्या बाजारात एका वर्षात उतरली ‘या’ खेळाडूंची किंमत; सहन करावा लागला तोटा
आयपीएल २०२२ च्या सुरुवातीच्या सामन्यांना मॅक्सवेल मुकणार? जाणून घ्या सविस्तर