पाकिस्तानमध्ये क्रिकेट भ्रष्टाचाराची प्रकरणे वाढत आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी क्रिकेटमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या दोषी खेळाडूंसाठी फाशीची मागणी केली आहे.
मियाँदाद (Javed Miandad) यांचा असा विश्वास आहे की, एका क्रिकेटपटूसाठी स्पॉट फिक्सिंगपेक्षा (Spot Fixing) मोठा गुन्हा दुसरा कोणताही नसतो. यावेळी मियाँदाद म्हणाले की, स्पॉट फिक्सिंगमध्ये समावेश असणाऱ्या खेळाडूंना कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यांना फाशी (Hanged) दिली पाहिजे. कारण, हा गुन्हा एखाद्याचा खून करण्याइतका मोठा आहे.
मियाँदाद यावेळी म्हणाले की, मला असे वाटते की, जे खेळाडू दोषी असतात ते आपल्या परिवार आणि आई-वडिलांबरोबरही चांगले वागत नाहीत. त्यामुळे जर त्यांना शिक्षा मिळाली तर ते अशाप्रकारचं चूकीचं काम करणार नाहीत. हे लोक अशी चूक करतात त्या लोकांना जगण्याचा अधिकार नाही.
याव्यतिरिक्त पाकिस्तान (Pakistan) क्रिकेटमध्ये अनेक क्रिकेटपटूंची स्पॉट फिक्सिंग आणि भ्रष्टाचार करूनही ते खेळाडू आजही खेळत आहेत. यामुळेच मियाँदाद यांना असे वाटते की अशा प्रकरणांमधील दोषी लोकांना अशी शिक्षा दिली पाहिजे जेणेकरून एक उदाहरण तयार होईल. पुन्हा कोणताही खेळाडू असा विचार कधीच करणार नाही.
विश्वचषक १९९२मधील विजयी संघ पाकिस्तानचा भाग असणारे मियाँदाद नेहमी आपल्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात नेहमीच सापडतात. त्यामुळे आता त्यांनी केलेल्या या विधानामुळेही चर्चा सुरु झाली आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज??? मंधानाने दिले हे उत्तर
-लाईफ पार्टनर होण्यासाठी स्मृती मंधानाने ठेवल्या या दोन अटी
-हे ५ आयपीएल विक्रम मोडणं जवळपास अशक्यच