इंडियन प्रीमियर लीगनंतर (आयपीएल) देशात कोणत्या लीगची सर्वात जास्त चर्चा होत असते, ती म्हणजे टीएनपीएल अर्थातच तमिळनाडू प्रीमियर लीग. सध्या टीएनपीएलचा सुरू असलेला हंगाम शेवटाकडे आला आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या क्वालिफायरच्या सामन्यात लायका कोवई किंग्जने नेल्लई रॉयल किंग्जला २ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात शाहरूख खानने धमाकेदार फलंदाजी करत संघाच्या विजयात महत्वाची भुमिका निभावली. त्याच्या बहारदार खेळीने संघाने अंतिम फेरीत धडक मारली.
लायका कोवई किंग्जचा कर्णधार शाहरूख खान (Shahrukh Khan) याने शेवटच्या षटकात १६ धावा केले. त्यामुळे संघाचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाले. त्याने या सामन्यात २४१.६७च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येताना २४ चेंडूत नाबाद ५८ धावा केल्या. यामध्ये ४ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे.
या सामन्यात नेल्लई रॉयल किंग्जने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी २० षटकात ६ विकेट्स गमावत २०८ धावा केल्या. हे लक्ष्य लायका कोवई किंग्जने ८ विकेट्स गमावत २०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पार केले. या सामन्यात लायका कोवई किंग्जला शेवटच्या षटकात विजयासाठी १६ धावांची आवश्यकता होती. अशावेळी शाहरुखने कर्णधाराची योग्य भुमिका बजावली.
+ 1/21 with the ball!
Chased 16 in the last over ✅
Highest successful chase in #TNPL history ✅
Led his team to their first-ever final ✅Take a bow, @shahrukh_35! 🫡#SherSquad #PunjabKings #SaddaPunjab #ShahrukhKhan pic.twitter.com/CoC98YpzlB
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) July 30, 2022
शाहरुखने तुफानी फलंदाजीला सुरूवात करत पहिल्या चेंडूवर चौकार मारला. तर दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि तिसऱ्या चेंडूवर पुन्हा चौकार ठोकला. त्याच्या या फटकेबाजीने संघ विजयापर्यंत पोहोचला. तसेच ते पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचले आहेत. हा टीएनपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावांचा विजयी लक्ष्याचा पाठलाग ठरला आहे.
टीएनपीएलचा अंतिम सामना रविवारी (३१ जुलै) खेळला जाणार आहे. यामध्ये लायका कोवई किंग्ज(Lyca Kovai Kings) चेपॉक सुपर गिलीज (Chepauk Super Gillies) याच्यात खेळला जाणार आहे. या सामन्याला सध्याकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी सुरावात होणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IND vs PAK Live| एल क्लासिको सामन्यात पावसाचा अडथळा, नाणेफेकीस विलंब
भारतासाठी निर्णायक खेळी करणारा कार्तिकच म्हणतोय, ‘फिनिशरची भूमिका सोपी नाही!’ वाचा सविस्तर
मॅचही गेली आणि पैसेही! पहिल्या टी२०तील पराभवानंतर आयसीसीकडून वेस्ट इंडिजवर कारवाई