केएल राहुल आणि जडेजा वगळता इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत एकही फलंदाज विशेष काही करू शकला नाही. इंग्लिश वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने भारतीय संघाची वरची फळी उध्वस्त केली. यानंतर विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या खराब कामगिरीवर प्रत्येकजण टीका करत आहे. मात्र, भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माही कसोटीत विशेष कामगिरी करू शकत नाहीय. प्रत्येक सामन्यात तो काही ना काही चूक करतो आणि कमी धावसंख्येवर विकेट गमावतो. अशा परिस्थितीत त्याच्या कसोटी संघातील सलामीवीराच्या भूमिकेवर आता प्रश्न निर्माण झाला आहे.
कसोटीत सलामीवीर म्हणून रोहितला संधी देणे किती योग्य?
न्यूझीलंडविरुद्धचा जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना असो किंवा इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीचा पहिला डाव, यात रोहित शर्मा बॅटची ताकद दाखवू शकलेला नाही. एकदिवसीय आणि टी-२० मध्ये रोहित ज्याप्रकारे कामगिरी करतो, तशी कसोटीत करण्यात तो अयशस्वी ठरतो असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
भारत आणि इंग्लंड यांच्यात नॉटिंघममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात रोहित १०७ चेंडूत फक्त ३६ धावा करू शकला. सलामीवीर म्हणून त्याची ही कामगिरी अतिशय चिंताजनक आहे. कारण सलामीवीरांकडून संघाला भक्कम धावसंख्येची अपेक्षा असते. रोहित डावाची सुरुवात व्यवस्थित करतो. परंतु पुढे त्याला आपली खेळी मोठ्या धावसंख्येत रुपांतरित करण्यास अपयश येते.
रोहित शर्माने त्याच्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत ४० सामने खेळले आहेत. ज्यात त्याने २७२७ धावा केल्या आहेत. भारतीय संघाकडे युवा खेळाडूंची कमतरता नाही. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर रोहितच्या जागी अशा खेळाडूला सलामीची संधी मिळावी, जो संघाच्या वरच्या फळीला अजून मजबूत बनवेल. असा खेळाडू सध्या संघाकडे उपलब्ध असून त्याचे नाव पृथ्वी शॉ आहे.
पृथ्वी शॉला मिळू शकते संधी
पृथ्वी शॉ श्रीलंका दौऱ्यावरून थेट इंग्लंडला पोहोचला आहे. क्वारंटाईनमध्ये असल्याने शॉ अद्याप पहिल्या कसोटी सामन्याचा भाग नाही. मात्र, या खेळाडूने संघ व्यवस्थापनाला त्याच्या खेळाने खूप प्रभावित केले आहे आणि त्यानंतरच खेळाडू जखमी झाल्यानंतर त्याला इंग्लंडला बोलावण्यात आले आहे. या युवा खेळाडूमध्ये सचिन तेंडुलकरची झलक आहे. तो ज्या प्रकारे फलंदाजी करतो ते शानदार आहे.
शॉ मागील काही काळात खराब फॉर्ममध्ये होता, ज्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले होते. मात्र, आता हा खेळाडू आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. त्यामुळे येत्या काही सामन्यांत केएल राहुलसह पृथ्वी शॉला सलामीला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
फलंदाजांच्या कानाजवळून शिट्टीचा आवाज काढत जाणारे चेंडू टाकण्यासाठी कुप्रसिद्ध ठरलेला गोलंदाज
फिरकीपटू राशिदच्या गोलंदाजीची दहशत! यष्टीरक्षकाने केली अशी काही कृती, चाहतेही गेले गोंधळून
लाईव्ह सामन्यात १००% मनोरंजन! रिषभ मैदानातच मारू लागला बेडूक उड्या, पाहून रोहित-विराट अचंबित