Loading...

ती गोष्ट केली तर युजवेंद्र चहल बनणार भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा टी20 आंतरराष्ट्रीय सामना तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज (8 डिसेंबर) खेळला जाईल. जर या सामन्यात युजवेंद्र चहलने 1 विकेट घेतली तर तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनेल.

Loading...

चहलने शुक्रवारी(6 डिसेंबर) हैदराबाद टी20 सामन्यात 2 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत आर अश्विनसह संयुक्तपणे पहिले स्थान मिळवले होते. 

चहलने सध्या 35 सामन्यांत 52 विकेट्स घेतले आहेत. तर अश्विननेही आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 46 सामन्यात 52 विकेट्स घेतले आहेत. अश्विन आणि चहल पाठोपाठ या यादीत जसप्रीत बुमराह आहे. बुमराहने 42 सामन्यात 51 विकेट्स घेतल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या जगातील एकूण गोलंदाजांमध्ये श्रीलंकेचा लसिथ मलिंगा 106 विकेटसह पहिल्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 100 पेक्षा अधिक विकेट्स घेणारा तो पहिला आणि सध्यातरी एकमेव गोलंदाज आहे.

Loading...

या यादीत त्याच्यापाठोपाठ पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आहे. आफ्रिदीच्या नावावर 98 विकेट्स आहेत आणि शाकिब अल हसन 92 विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

-आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज – 

52 विकेट्स – युजवेंद्र चहल (35 सामने)

Loading...
Loading...

52 विकेट्स – आर अश्विन (46 सामने)

51 विकेट्स – जसप्रीत बुमराह (42 सामने)

39 विकेट्स – भुवनेश्वर कुमार (41 सामने)

38 विकेट्स – हार्दिक पंड्या (40 सामने)

You might also like
Loading...