भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर 3 एकदिवसीय मालिकेस सुरुवात झाली आहे. यातला ब्रिजटाऊनमध्ये खेळला गेलेला पहिला सामना भारताने आपल्या नावावर केला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघ 23 षटकांत केवळ 114 धावा करत सर्वबाद झाला, तर भारताने 22.5 षटकांत 118 धावा करून सामन्यावर विजय प्राप्त केला. सामन्यादरम्यान संजू सॅमसन प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसला नाही, पण संपूर्ण मैदानावर संजूच्या नावाची चर्चा होती.
भारतीय संघाने यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांच्यात ईशानला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा दिली. सोबतच सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) हा प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळताना दिसला. मैदानावर असताना सूर्याने सॅमसनची जर्सी घातली होती. सूर्याच्या या मैत्रीच्या भावनेने सर्व क्रिकेट चाहत्यांचे मन जिंकले. अशाप्रकारे मैदानावर नसून देखील सॅमसनचे नाव या सामन्यादरम्यान चर्चेत राहिले.
सूर्यकुमारच्या एका चाहत्याने ट्वीट केले आहे. त्याने लिहिले की, “संजू सॅमसनला आज परत प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली नाही. मात्र, सूर्यकुमारने सॅनसनच्या नावाची जर्सी घालून चाहत्यांची मने जिंकली. सूर्यकुमार हा कधीच कोणासोबत अन्याय होताना पाहू शकत नाही. तो प्रत्येकाच्या खराब वेळेत प्रत्येकेला साथ देत असतो. खरंच सूर्याभाऊ तू महान आहेस.”
संजू सैमसन को आज फिर प्लेइंग इलेवन में जगह नहीं मिली मगर सूर्यकुमार यादव ने उनके नाम की जर्सी पहनकर पूरे देश का दिल जीत लिया है।
यादव किसी के साथ अन्याय होता नहीं देख सकते हैं, यादव सबके साथ खड़े रहते हैं यही हमारी खासियत है। सूर्या भाऊ तो महान है🔥 pic.twitter.com/eRxlcEds8v
— Jaiky Yadav (@JaikyYadav16) July 27, 2023
संजू सॅमसनच्या एकदिवसीय कारकीर्दीबद्दल सांगायचे झाले, तर भारतासाठी त्याने 11 सामने खळले आहेत. त्यात त्याने 10 सामन्यामध्ये 330 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 2 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, सूर्यकुमारच्या एकदिवसीय क्रिकेट कारकीर्दीत त्याने 21 सामन्यात 433 धावा केल्या आहेत. यात त्याने 2 अर्धशतके झळकवली आहेत. (ind vs wi suryakumar yadav wearing sanju samsons jersey)
महत्वाच्या बातम्या-
अर्रर्र! शार्दुलची ‘ती’ चूक अन् विंडीजला फायदा, कर्णधार रोहितने लाईव्ह सामन्यातच केला बाजार, Video Viral
बॅटिंग न करताही विराटने लुटली मैफील, एका हाताने कॅच पकडत फलंदाजाला दाखवला तंबूचा रस्ता- व्हिडिओ