fbpx
Monday, January 18, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खेळांसाठी येणार ‘अच्छे दिन’! भारत सरकार वाढवतेय ‘या’ योजनेची व्याप्ती

भारत सरकार खेलो इंडिया योजनेअंतर्गत १,००० नवी क्रीडा केंद्रे उभारणार आहे.

December 8, 2020
in टॉप बातम्या, अन्य खेळ
0
Photo Courtesy: Twitter/@Khelo India

Photo Courtesy: Twitter/@Khelo India


भारत सरकारची महत्वकांक्षी योजना असलेल्या ‘खेलो इंडिया’ ची व्याप्ती आता वाढणार आहे. त्यासाठी खेलो इंडिया योजनेअंतर्गत १,००० नवीन क्रीडा केंद्रे उभारणार असल्याचे केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी म्हटले आहे. त्यामध्ये, निवृत्त क्रीडापटूंना प्रशिक्षक म्हणून नोकरी दिली जाईल, असेही रिजिजू यांनी नमूद केले.

१००० नवी क्रीडा केंद्रे उभारणार
फिक्कीने आयोजित केलेल्या दहाव्या ग्लोबल स्पोर्ट्स समीटमध्ये बोलताना रिजिजू म्हणाले, ‘भारत सरकार आणि क्रीडा मंत्रालय देशभरात १,००० लहान क्रीडा केंद्रे उभारण्याच्या योजनेविषयी गंभीर विचार करत आहोत. याद्वारे निवृत्त क्रीडापटूंच्या नोकरीचा प्रश्न सोडवणे, आमचे मुख्य ध्येय आहे. या खेळाडूंच्या अनुभवातून अनेक युवा आणि प्रतिभावंत खेळाडू पुढे येऊ शकतात. ही भारताच्या क्रीडा संस्कृतीच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक बाब आहे.’
माजी खेळाडूंविषयी बोलताना रिजिजू म्हणाले,
‘निवृत्त झालेल्या खेळाडूंना अनेकदा बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. जेव्हा एखाद्या खेळाडूला अशा गोष्टींमुळे त्रास होतो तेव्हा एक पिढी नैराश्यात जाते. त्यांची अवस्था पाहून कोणी खेळाडू होण्याकडे गांभीर्याने पाहत नाही. आमचा हाच प्रयत्न राहील की, या खेळाडूंना नोकरी देऊन त्यांच्या उदरनिर्वाहाची आम्ही सोय करू.’

लोकांच्या मदतीची गरज
भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रातील मान्यवरांना क्रीडा क्षेत्राशी जोडण्याचे आवाहन रिजिजू यांनी केले. ते म्हणाले, ‘सरकार सर्वच पातळ्यांवर सर्वश्रेष्ठ कामगिरी करू शकत नाही. त्यात नक्कीच काही त्रुटी राहतात. एक मोठी शोकांतिका आहे की, आपल्याकडे खेळासाठी पोषक वातावरण नाही. ही एकट्या सरकारची जबाबदारी नाही. यासाठी लोकांनी एकत्र यायला हवे. भारतातील दोन टक्के लोकांनी जरी एक खेळायला किंवा पाहायला सुरुवात केली, तर भविष्य वेगळे असू शकते. जे खेळाच्या वाढीसाठी पोषक असेल. आपल्या देशाला क्रीडा क्षेत्रात मोठे भवितव्य आहे. ज्या द्वारे भारताच्या अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळेल.’

भारत सरकारने सन २०१८ मध्ये ‘खेलो इंडिया’ या योजनेची सुरुवात केली होती. या योजनेद्वारे तळागाळातील प्रतिभावंत क्रीडापटू शोधण्याचे काम केले जाते. आतापर्यंत या योजनेचे दोन स्पर्धात्मक हंगाम खेळले गेले आहेत. ज्याद्वारे हजारो युवा खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवले आहे.

महत्वाच्या बातम्या:
– ब्रेकिंग! बेन स्टोक्सच्या वडिलांचे ब्रेन कॅन्सरने निधन
– ब्रेकिंग: आयसीसी टी२० क्रमवारी जाहीर, पाहा टीम इंडिया आहे कोणत्या स्थानावर
– कौतुकास्पद! भारतीय महिला फुटबॉलर बाला देवीने रचला इतिहास

 


Previous Post

कौतुकास्पद! भारतीय महिला फुटबॉलर बाला देवीने रचला इतिहास

Next Post

‘हा’ गोलंदाज विश्वचषक स्पर्धेत संघासाठी ठरू शकतो महत्वपूर्ण, विराटने केली भविष्यवाणी 

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@cricbaroda
टॉप बातम्या

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : सांघिक कामगिरीच्या बळावर बडोदा बाद फेरीत, गुजरातचा केला पराभव

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricketcomau
टॉप बातम्या

“ऑस्ट्रेलियाने डाव लवकर घोषित करायला हवा होता”, माजी ऑस्ट्रेलियन दिग्गजांनी केली टीका

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

ब्रिस्बेन टेस्ट : भारत विजयी झाल्यास कांगारूंच्या तीन दशकांच्या सुखस्वप्नाला लागणार सुरुंग! जाणून घ्या

January 18, 2021
Screengrab: Twitter/ cricketcomau
क्रिकेट

व्वा काय डोकं चालवलंय! चेंडू चमकवण्यासाठी मयंकने शार्दुलच्या हातावर घासला चेंडू, पाहा व्हिडिओ

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

शब्बास रे पठ्ठ्या! सिराजने पदार्पणाची मालिका खेळतानाच मिळवले ‘या’ दिग्गजांच्या यादीत स्थान

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCI
टॉप बातम्या

ब्रिस्बेन कसोटीतील दमदार कामगिरीनंतर सिराजची प्रतिक्रिया, ‘या’ कारणासाठी मानेल रहाणेचे आभार

January 18, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/@BCCI

'हा' गोलंदाज विश्वचषक स्पर्धेत संघासाठी ठरू शकतो महत्वपूर्ण, विराटने केली भविष्यवाणी 

Photo Courtesy: Twitter/@ICC

एकटा विराट पडतो ऑस्ट्रेलियावर भारी! पहा कांगारूंविरुद्धची भारतीय कर्णधाराची आकडेवारी

Photo Courtesy: Twitter/@BCCI

टी२० चाही विराट 'राजा', 'या' विक्रमात देखील पोहोचला अव्वल स्थानी

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.